Jalgaon Firing | जळगावात प्रेमसंबंधाला विरोध; दुचाकीवरील भावाच्या प्रेयसीवर झाडली गोळी

भावाच्या प्रेमसंबंधाला विरोधातून हल्ला केल्याचा आरोप; ३५ वर्षीय महिला जखमी, भावासह साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime Newsfile photo
Published on: 
Updated on: 

Jalgaon Firing Incident

जळगाव : दसऱ्याच्या रात्री जळगाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली. भावाच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याच्या कारणावरून अनिकेत मधुकर सपकाळे याने आपल्या साथीदारासह दुचाकीवरून जाणाऱ्या भावाला आणि त्याच्या प्रेयसीला गाठून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिलेच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने जखमी झाल्या. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अनिकेत सपकाळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला जळगाव शहरातील गोपाळपुरा परिसरात राहतात. त्या जैन इरिगेशन कंपनीत मजुरी करून आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे सोनीनगर, पिंप्राळा येथील रोहन मधुकर सपकाळे (वय ३०) याच्याशी प्रेमसंबंध होते. मात्र, रोहनचा भाऊ अनिकेत याचा या संबंधांना विरोध होता. याच कारणावरून दोन दिवसांपूर्वी सपकाळे कुटुंबात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर रोहन घराबाहेर राहत होता.

Crime News
Jalgaon Crime : वाहनाचा लाईट डोळ्यावर पडल्यावरून राडा; टोळक्याकडून तरुणाचा खून, दुसरा गंभीर

मंगळवारी (दि. २०) रात्री रोहन आणि संगिता हे मेहरुण ट्रॅक परिसरात रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. या दरम्यान अनिकेत रोहनला वारंवार फोन करून तो कुठे आहे, अशी विचारणा करत होता.

जुन्या बसस्थानकासमोर गोळीबार

मध्यरात्री साडेबारा ते पावणेएकच्या सुमारास रोहन आणि महिला दुचाकीवरून जेवणाचे पार्सल शोधण्यासाठी टॉवर चौकाकडून गोपाळपुराच्या दिशेने जात होते. ते जुन्या बसस्थानकासमोर आले असता, अनिकेत हा एका साथीदारासह दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागे आला. त्याने महिलेला शिवीगाळ करत दोघांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप आहे.

Crime News
Jalgaon Fraud | टक्कल करून वेषांतर: दुरंतो एक्स्प्रेसमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न; सव्वा कोटीचा गंडा घालणारा महाठग जेरबंद

या गोळीबारात एक गोळी महिलेच्या डाव्या पायाला गुडघ्याजवळ लागली. त्या जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. घटनेनंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. रोहनने तातडीने महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

महिलेच्या जबाबावरून अनिकेत सपकाळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दसऱ्याच्या रात्री शहरातील गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news