Jalgaon Fraud | टक्कल करून वेषांतर: दुरंतो एक्स्प्रेसमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न; सव्वा कोटीचा गंडा घालणारा महाठग जेरबंद

मुख्य संशयित दीपेश रुपानी याला जेरबंद करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश
Fraud Case
Fraud Case
Published on: 
Updated on: 

nvestment Fraud Jalgaon

जळगाव : ‘हर्बल लाईफ’ कंपनीत भरघोस नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य संशयित दीपेश कमलेश रुपानी याला जेरबंद करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी टक्कल करून वेषांतर करणाऱ्या रुपानीने बडनेरा रेल्वे स्थानकावर धावत्या दुरंतो एक्स्प्रेसमधून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.

दीपेश रुपानी (रा. सुमन रेसिडेन्सी, गणपती नगर, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हर्बल लाईफ कंपनीत गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्याने शहरातील गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन सुमारे सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता.

Fraud Case
Jalgaon Shocking News : अतिक्रमण कारवाईचा भडका! संतापलेल्या रसवंती चालकाने फोडली महापौरांचीच गाडी; जळगाव मनपात थरार!

बनावट सिमकार्ड, टक्कल करून पोलिसांना गुंगारा

अटकेपासून वाचण्यासाठी रुपानीने राजस्थान, जोधपूर, नागपूर आणि खामगाव अशा विविध ठिकाणी आपले वास्तव्य बदलले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने बनावट सिमकार्डचा वापर केला. एवढेच नव्हे, तर ओळख पटू नये म्हणून टक्कल करून नेहमीचा पेहरावही बदलला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले होते.

गोव्याच्या माहितीवरून तपासाला वेग

आरोपी गोव्यात असल्याची गोपनीय माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन पाटील यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दीपेश सीएसएमटी-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांचे पथक भुसावळ रेल्वे स्थानकावर दाखल झाले.

या गाडीचा भुसावळ येथे अवघ्या पाच मिनिटांचा थांबा असल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ आणि पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील यांनी तत्काळ गाडीत चढून आरोपीचा शोध सुरू केला.

Fraud Case
Jalgaon News : ‘शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्यास गय नाही’; जळगावात बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

बडनेऱ्यात धावत्या गाडीतून उडी

दुरंतो एक्स्प्रेस बडनेरा रेल्वे स्थानकावर संथ होत असताना पोलिसांची चाहूल लागल्याने दीपेशने धावत्या गाडीतून फलाटावर उडी मारली आणि पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनीही तत्काळ पाठलाग सुरू केला. काही अंतरावरच त्याला पकडून बेड्या ठोकण्यात आल्या.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय निकुंभ, पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील, समाधान पाटील, घनशाम पवार आणि विजय शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

दीपेश रुपानी याने अनेकांना अशाच प्रकारे कोट्यवधींचा चुना लावला असण्याची दाट शक्यता आहे. हर्बल लाईफच्या नावाखाली ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी कसलीही भीती न बाळगता तत्काळ आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा.

— नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news