अशोक जैन यांचे दोन बनावट व्हाट्सअप अकाउंट

अशोक जैन यांचे दोन बनावट व्हाट्सअप अकाउंट

जळगाव- जैन इरिगेशन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाने व्हाट्सअपला दोन बनावट अकाउंट उघडून त्याद्वारे नागरिकांशी संवाद साधून वाईस कॉल करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे दोनही अकाउंट फेक असून त्याद्वारे कुणाशी संपर्क झाल्यास त्यांनी तत्काळ कळवावे असे आवाहन जैन यांनी केले आहे.

एक युनायटेड स्टेट तर दुसरं अन्य ठिकाणाहून अशा वेगवेगळ्या दोन नंबर वरतून अशोक जैन यांचा फोटो लावून बनावट व्हाट्सअप अकाउंट तयार करण्यात आले आहे.  त्याद्वारे नागरिकांना मेसेज करून किंवा व्हिडिओ कॉल करण्यात येत आहे. याबाबत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांना माहिती मिळाली असता त्यांनी असे अकाउंट बनावट असून अशी अकाऊंट वरून नागरिकांना संपर्क झाल्यास त्यांनी अशोक जैन व त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. +२३९ ७०४६७४७४८३ व+१(५१०)७०७-२१०९ या बनावट क्रमांकावर त्याचे फोटो लावून अकाउंट तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news