जळगांव पुढारी वृत्तसेवा ; येत्या काळात लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 होणार असल्याने केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील बदलीस पात्र असलेल्या आठ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
येत्या काळात देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे नाशिक परिक्षेत्रात 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आयजी बी. जी शेखर यांनी नुकत्याच केल्यात. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल माणिकराव हिरे, चाळीसगाव ग्रामीण ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव, रामानंद पोलीस स्टेशन शिल्पा गोपीचंद पाटील यांची जळगाव येथील अकार्यकारी पदावर बदली करण्यात आली आहे. गृह विभाग जळगाव रामकृष्ण महादू कुंभार यांना अहमदनगर कंट्रोल रूम जळगाव अरुण काशिनाथ धनवडे, पाचोरा राहुल सोमनाथ खताळ, भडगाव राजेंद्र प्रल्हाद पाटील याची बदली नाशिक ग्रामीण ला बदली करण्यात आलेली आहे. तर कांतीलाल काशिनाथ पाटील यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे.
ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे कार्यमुक्त करताना पर्यायी किंवा बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाट पाहू नये असे आदेशात म्हणण्यात आलेले आहेत. तसेच निवडणूक आयुक्त यांच्या आदेशाचे भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगितले आहे.