

जळगाव : वाळूचे डंपर चालू देण्यासाठी तहसीलदार व तलाठी यांना प्रत्येकी महिन्याला 73 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगून 73000 लाच घेताना खाजगी इसमासह तलाठी व कोतवाल हे अटक करण्यात आलेली आहे.
तक्रारदार याचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने आरोपी खाजगी सण शिवदास कोडी याला फोन करून भुसावळ येथून डंपरणे वाळू वाहतूक करू देण्यासाठी तलाठी नितीन पंडितराव केले. सज्जा वराडसीम तालुका भुसावळ, जयराम रघुनाथ भालेराव कोतवाल यांचे नावे सांगून 73 हजार रुपयाची लाख मागणी केली येणे वाळूचा डंपर चालू देण्यासाठी तहसीलदार मंडल अधिकारी व तलाठी यांच्यासाठी प्रत्येकी 73 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल असे सांगितले व तलाठी व कोतवाल यांनी त्याला प्रोत्साहन दिले. आज 73 हजार रुपयाची लाच स्वीकारताना आरोपी शिवदास कोळी याला रंगेहात पकडले.
तर यातील नितीन केले तलाठी यांच्या ताब्यातील बॅगची झडती घेतली असता त्यात एक लाख 65 हजार रुपये रोख सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल आरोपी जयराम रघुनाथ भालेराव याच्याजवळ वन प्लस कंपनीचा मोबाईल तर आरोपी शिवराम कोळी याच्या जवळ 73 हजार रुपये रोख व याव्यतिरिक्त 86 हजार रुपये रोख मिळून आले.
याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आले. असून त्यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील बाळू मराठे राकेश दुसाने प्रणय ठाकूर भूषण पाटील यांनी हा सापडा यशस्वी केला.