Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात जामनेरचा भाजपा पदाधिकारी अटकेत

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात जामनेरचा भाजपा पदाधिकारी अटकेत
Shalarth ID Scam
Shalarth ID ScamPudhari Photo
Published on
Updated on

Shalarth ID Scam latest news

जळगाव: राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचे धागेधोगे आता जळगाव जिल्ह्यापर्यंत आणि थेट जामनेर तालुक्यापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी जळगावातील शिक्षण संस्थाचालक तथा भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना अटक केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथून त्यांना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. नाशिक पोलिसांच्या पथकाने मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असलेल्या संजय गरुडला सोलापुरातून अटक केली.

Shalarth ID Scam
Jalgaon Sand Mafia|अवैध वाळूचा डंपर पकडणाऱ्या तहसीलदारांनाच धमकी; माफियांनी वाळू टाकून डंपर पळवला

कोण आहे संजय गरुड?

संजय गरुड हा नामांकित संस्थाचालक असून जामनेर तालुक्यात त्यांच्या संस्थेच्या सुमारे १५ ते २० शाळा कार्यरत आहेत. राजकीय वर्तुळातही त्याची उठबस होती. 30 जानेवारी 2024 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची साथ सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे ग्रामविकास मंत्री अन् 'संकटमोचक' मानले जाणारे गिरीश महाजन, तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा हा भाजप प्रवेश झाला होता. सध्या ते भाजपचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Shalarth ID Scam
Gulabrao Patil | चिंचोली उपकेंद्रामुळे सात गावांना दिलासा; उमाळा येथे जागा उपलब्ध झाल्यास नवीन उपकेंद्र उभारणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील

पोलिसांच्या अधिकृत निवेदनाकडे लक्ष

शालार्थ आयडीच्या तपासात गरुड यांचे नाव निष्पन्न झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, या अटकेबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत सविस्तर निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून, या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील आणखी कोणत्या बड्या हस्तकांचे आणि संस्थांचे नाव समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news