Jalgaon news: कोंबड्यांच्या खाद्याच्या नावाखाली रेशन धान्याचा काळाबाजार; पारोळ्यात ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंबड्यांच्या खाद्याचा छापा असलेल्या गोण्यांमध्ये शासकीय रेशनचा गहू आणि तांदूळ लपवून काळ्या बाजारात तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार पारोळा शहरात उघडकीस आला आहे.
crime News
crime Newspudhari photo
Published on
Updated on

Jalgaon news Ration grain black marketing

जळगाव: कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये शासकीय रेशनचा गहू आणि तांदूळ लपवून काळ्या बाजारात तस्करी करण्याचा धक्कादायक प्रकार पारोळा शहरात उघडकीस आला आहे.

पारोळा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत २ लाख १२ हजार ९७० रुपयांचे ७३.५४ क्विंटल धान्य आणि ५ लाखांचा मालवाहू ट्रक असा एकूण ७ लाख १२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी धान्यमालक सुभाष विठ्ठल वाणी (वय ६१, रा. पारोळा) आणि फरार अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime News
Jalgaon News | वहिनीच्या खूनप्रकरणी दिराला जन्मठेप! जळगाव सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पारोळा शहरातील 'सप्तर्षी मंगल कार्यालया'च्या समोर आणि भाग्यश्री टोल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई भूषण राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सप्तर्षी मंगल कार्यालयासमोर, पारोळा शहर येथे टाटा कंपनीचा केशरी मालवाहू ट्रक (एमएमएच 16 ए इ -6866) ५ लाख रुपये किंमतीच्या १६२ गोण्या गहू व २ लाख १२ हजार ९७० रुपयांचा तांदूळ (वजन ७३.५४ क्विंटल), असा एकूण ७ लाख १२ हजार, ९७० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

संशयित आरोपींनी कोणत्याही वैध परवान्याशिवाय, प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी कोंबड्यांच्या खाद्याचे लेबल असलेल्या गोण्यांमध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरला होता. सुभाष वाणी आणि ट्रक चालकाने आपसात संगनमत करून हा साठा काळ्या बाजारात विकण्यासाठी वाहतूक करत होते. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

crime News
Jalgaon Gram Sevak Death | ग्रामसेवकाच्या मृत्यूप्रकरणी सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news