Jalgaon Crime | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोघांना अटक

तिसऱ्या रोडरोमिओकडून विनयभंगाचा प्रयत्न
Minor Girl Assault Case
Minor Girl Assault Case Pudhari
Published on
Updated on

Pachora Minor Girl Assault Case

जळगाव : पाचोरा शहरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दोन तरुणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार घडत होता. पीडितेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसांनी दोघा मुख्य आरोपींना अटक केली असून, तिसऱ्या एका तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पाचोरा शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

धमक्यांच्या आधारे अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पाचोरा येथील रहिवासी असून ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव आरोपींना होती. पवन संजय परदेशी आणि प्रथमेश पाटील (दोघे रा. पाचोरा) यांनी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला मानसिक दबावाखाली ठेवले. या भीतीचा गैरफायदा घेत त्यांनी तिला काकणबर्डी परिसर तसेच अंतुर्ली रोडवरील शेतात नेऊन वेगवेगळ्या वेळेस जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Minor Girl Assault Case
Jalgaon Crime | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; मदत करणाऱ्या महिलेलाही दोन वर्ष शिक्षा

तिसऱ्या आरोपीकडून छेडछाड

या प्रकरणातील तिसरा संशयित विकी शिवाजी राजपूत (रा. पाचोरा) यानेही पीडितेचा वारंवार पाठलाग केला. तिने विरोध केला असतानाही तिच्याशी गैरवर्तन करत बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

धैर्याने पोलीस ठाणे गाठले

दीर्घकाळ चाललेल्या त्रासामुळे मानसिक दबावाखाली असलेल्या पीडितेने अखेर भीतीवर मात करत २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.४८ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती कथन केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news