

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जळगाव, रावेर, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव अशा सात तालुक्यातील 15 मंडळांमध्ये रविवार (दि.21) आणि सोमवार (दि.22) रोजी दोन दिवस अतिवृष्टी झाली. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाली आहे.
जिल्ह्यात एकाचा मृत्यू, 58 पशुंचा बळी, 734 घरांची पडझड झाली असून, 231 कुटुंबांना अतिवृष्टीमुळे स्थलांतरित करावे लागले आहे.
दोन दिवस झालेल्या पावसाची नोंद अशी...
भडगाव व आमळदे (भडगाव तालुका) : 139.3 मि.मी.
हाताळे (चाळीसगाव) : 115.5 मि.मी.
तामसवाडी व चोरवड (पारोळा) : 99.5 मि.मी.
शिरगाव, मेहुणबारे (चाळीसगाव) : 78.5 मि.मी.
म्हसावद (जळगाव) : 77.3 मि.मी.
निंभोरा (रावेर) : 68.5 मि.मी.
पाचोरा : 139.3 मि.मी.
नांद्रा (पाचोरा) : 70.8 मि.मी.
पिंपळगाव (पाचोरा) : 67.8 मि.मी.
वरखेडी (पाचोरा) : 68 मि.मी.
फतेपूर (जामनेर) : 67 मि.मी.
जळगाव तालुक्यातील भोकरी येथील सतीश मोहन चौधरी (वय 35) यांचा वरखडे नाल्यात पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
पाचोरा तालुका : 1 मृत्यू, 1 पशुहानी, 171 घर पडझड, 231 स्थलांतरित कुटुंबे
भडगाव तालुका : 44 पशुहानी, 300 घर पडझड
एरंडोल तालुका : 8 पशुहानी, 228 घर पडझड
चाळीसगाव तालुका : 1 पशुहानी, 9 घर पडझड
जळगाव तालुका : 15 घर पडझड
पारोळा तालुका : 3 घर पडझड
जामनेर तालुका : 1 पशुहानी
अमळनेर तालुका : 2 पशुहानी
मुक्ताईनगर तालुका : 1 पशुहानी, 4 घर पडझड
रावेर तालुका : 3 घर पडझड
बोदवड तालुका : 1 घर पडझड
मनुष्यहानी मध्ये एकाचा मृत्यू झाला असून पशुहानीमध्ये 58 तर घर पडझडीच्या 734 घटना घडल्या आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे 231 कुटुंबाना स्थलांतर करावे लागले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची सुरुवात केली आहे.