Nepal Bus Accident : हुश्श! अखेर सुखरुप घरी पोहचलो; पर्यटकांनी विशेष रेल्वेचे मानले आभार

नेपाळ मधील 47 सहप्रवासी विशेष रेल्वे सुविधेत गावी परतले
नेपाळ पर्यटक
रेल्वेच्या विशेष बोगीमध्ये भुसावळ रेल्वे स्थानकावर नेपाळ दुर्घटनेतून सुखरुप पोहचल्यानंतर नातेवाईकांनी कडकडून मिठी मारली. (छाया : नरेंद्र पाटील)
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील 110 प्रवासी हे आयोध्या प्रयाग आणि त्यानंतर पशुपतिनाथ यांच्या दर्शनासाठी गेले असताना या प्रवासा दरम्यान बसचा अपघात होऊन 27 जणांचा दूर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या बसमधील प्रवाशांना रेल्वेच्या एका विशेष बोगीमध्ये भुसावळ रेल्वे स्थानकावर सुखरुप आणण्यात आले. त्यांना गावापर्यंत सुखरूप पोहोचविण्यात आले. शनिवार (दि.24) रोजी रात्रीपर्यंत डीआरएम ईती पांडे भुसावळ रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM Iti Pandey) हे जातीने लक्ष देत रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.

शुक्रवार (दि.23) रोजी नेपाळमध्ये देव दर्शनासाठी गेलेल्या 43 प्रवाश्यांची बस दरीत कोसळली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण 25 प्रवाश्यांसोबत बसचालक व बसवाहक असे 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासह असलेले दुसऱ्या बसमधील एकूण 47 सहप्रवाश्यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या विनंती वरून रेल्वे विभागा मार्फत विशेष एसी बोगी उपलब्ध करण्यात आली. जखमींना गोरखपूर येथून रेल्वेद्वारे भुसावळ स्टेशन येथे सुखरुप सोडण्यात आले आहे. यावेळी रेल्वे मार्फत प्रवाश्यांसाठी नाश्ता, जेवण, पाणी यासारख्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. रविवार (दि.25) रोजी रात्री रेल्वे भुसावळ स्टेशन येथे बस पोहचली असता डीआरएम इति पांडे (DRM Iti Pandey) यांनी स्वत: उपस्थित राहून सर्व प्रवाश्यांची विचारपूस केली. प्रवाश्यांना आपआपल्या घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. सुखरुप घरी पोहचल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे विभागा मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे विभागाचे आभार मानले.

नेपाळ पर्यटक
रेल्वेस्थानकावर पोहचताच प्रवाशांनी घ्यायला आलेल्या नातेवाईकांची गळाभेट घेत आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन दिली. (छाया : नरेंद्र पाटील)
नेपाळ पर्यटक
Jalgaon News | त्या २५ मृतदेहांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

अपघातातील 7 जण उपचारासाठी मुंबईकडे रवाना

उत्तर प्रदेश गोरखपूर येथून शुक्रवार (दि.23) रोजी निघालेली बस दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली. या बसमध्ये 43 प्रवासी होते. यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. यामधील जखमी असलेल्या 7 रुग्णांना मुंबई येथे विमानाने रविवार (दि.25) रोजी रात्री आणले. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नेपाळमधील पोखरा येथून बस क्रमांक यूपी.५३. एफटी.७६२३ ही काठमांडूला जात होती. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील देवदर्शनासाठी दोन बसमधून ११० प्रवाशी नेपाळला प्रयागराज, अयोध्यामार्गे जात होते. यातील एका बसला अपघात झाला. या बस मध्ये 43 प्रवासी बसलेले होते. त्यापैकी 27 जणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी अपघातात जखमी असलेल्या भाविकांवर नेपाळमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना सोमवार (दि.26) रोजी दुपारी 4 वाजेच्या इंडिगो विमानाने मुंबई येथे आणण्यात येणार आहे त्यानंतर या ठिकाणी केईएम रुग्णालयात किंवा जसलोक या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय तपासणी व पुढील उपचार झाल्यानंतर त्यांना स्वस्थ वाटल्यानंतर त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. विधानसभा सदस्य तथा राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन हे रुग्णांसाठी मुंबई येथील व्यवस्था बघत आहेत.

जखमींमध्ये भारती पाटील (भुसावळ), वर्षा भंगाळे (वरणगाव), कुमुदिनी झांबरे (वरणगाव), रूपाली सरोदे (वरणगाव), हेमराज सरोदे (वरणगाव), नीलिमा भिरूड (वरणगाव), सुनील धांडे (भुसावळ) हे भाविक आहेत. यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गोलू पाटील, केदार ओक हे देखील परतत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news