

बेळगाव : रेल्वे पोलिसांनी कर्नाटक आणि गोवा राज्यांमधील विविध ट्रॅव्हल एजन्सी आणि इतर ठिकाणी तपासणी मोहीम राबवून तिकिटांचा काळाबाजार करणार्या १७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ८१,५५३ रुपये किमतीची न वापरलेली तिकिटे त्याशिवाय प्रवाशांना दिलेली १,६१,७५२ किमतीची तिकिटेही जप्त करण्यात आली.
रेल्वेतून एकाच आसन क्रमांकाची तिकिटे तपासणीस आढळून आल्याने त्या प्रवाशांनी तिकीट खरेदी कोणत्या एजन्सीमार्फत केली, याची चौकशी करून रेल्वे पोलिसांनी १७ संशयितांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. बोगस रेल्वे तिकिटाचा सुळसुळाट झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी पावले उचलले आहे.