Jalgaon crime: कौटुंबिक वादातून पत्नीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न! कासोद्यात पतीला बेड्या

याप्रकरणी पतीविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Arrest
ArrestPudhari
Published on
Updated on

जळगाव : "माझ्या मामाच्या मुलीशी लग्न केले असते तर मला खूप पैसे मिळाले असते, तू घरी बसून फुकट खातेस," असे टोमणे मारत पत्नीला क्रूर वागणूक दिली जाते. तिच्या गळ्याला कापडाच्या उपरण्याने फास आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कासोदा गावात घडली आहे. याप्रकरणी पतीविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Arrest
Jalgaon crime: भुसावळ रेल्वे यार्डातील गोडाऊनमध्ये २३ वर्षीय युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील गढीवॉर्डातील रहिवासी निलेश भगवान पाटील आणि त्याची पत्नी सुनाक्षी निलेश पाटील (वय २४) हे १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी निलेशने सुनाक्षीस शिक्षणावरून व कमाई करत नसल्यावरून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. पत्नीला रडू आल्यानंतर आरोपीने अत्यंत चलाखीने डोळे पुसण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाच्या कापडी उपरण्याने तिच्या गळ्याला फास लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुनाक्षी यांच्यावर धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

Arrest
Jalgaon crime: मुक्ताईनगर हादरले! सततच्या छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलाने घेतला प्राण; १८ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या

फिर्यादी सुनाक्षी निलेश पाटील व आरोपी पती निलेश भगवान पाटील (दोघे रा. कासोदा, सध्या रा. उमराव क्वार्टर, देवळाली कॅम्प, नाशिक).धुळे येथून प्राप्त झालेल्या जबाबाच्या कागदपत्रांवरून कासोदा पोलीस ठाण्यात १६ ऑगस्ट रोजी (गु.र.नं. १२३/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९(१) व ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून कासोदा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाटील याला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news