Jalgaon ZP Reservation | जळगाव जिल्हा परिषद आरक्षणाची सोडत जाहीर; प्रस्थापितांना धक्का

काहींचे गट अबाधित राहिल्याने दिलासा मिळाला
Jalgaon Zilla Parishad election
जळगाव जिल्हा परिषद (Pudhari Photo)
Published on
Updated on

Jalgaon Zilla Parishad election

जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी गटवार आरक्षणाची सोडत आज (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. या सोडतीत ६८ गटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून अनेकांचे गट राखीव झाल्याने प्रस्थापितांना मोठा धक्का बसला आहे. तर काहींचे गट अबाधित राहिल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

या सोडतीच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि संभाव्य उमेदवार उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ६८ गटांसाठी खालीलप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात सर्वसाधारण प्रवर्ग – ३१, नागरिकांचा मागास प्रवर्ग  १८, अनुसूचित जाती : १३, अनुसूचित जमाती : ६ असे एकूण ६८ गट असून यापैकी ५० टक्के म्हणजे ३४ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Jalgaon Zilla Parishad election
Jalgaon Politics|जळगाव जिल्‍ह्यातील 15 पंचायत समितींचे आरक्षण जाहीर

आरक्षण खालीलप्रमाणे -

 नागरिकांचा मागास प्रवर्ग –

पातोंडा, घोडेगाव, म्हसावद, शहापूर, म्हसवे, दहिवद, कासोदा, मेहुणबारे, शिरसोदे, टाकळी प्र.चा., पिंपळगाव बुद्रुक, विखरण, नाडगाव, पाळधी, पातोंडा, नेरी दिगर, भालोद, लिहे हे गट या प्रवर्गाखाली आले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग –

उंबरखेड, लोहटार, नगरदेवळा बुद्रुक, बांबरुड प्र.बो., बहाळ, तामसवाडी, शिरसमणी, मांडळ, गिरड, तळई, कळमसरे, पाळधी खुर्द, न्हावी प्र. यावल, लासुर, पहुरपेठ, गुढे, साळवा, कुसंबे खुर्द, तोंडापूर, कजगाव, बेटावद बुद्रुक, जानवे, रांजणगाव, हरताळे, शिरसोली प्र.न., कुन्हे प्र.न., शेलवड, साखळी, लोहारा, ऐनपूर, सायगाव हे गट सर्वसाधारण प्रवर्गात राखीव आहेत.

अनुसूचित जमाती –

विरवाडे, धानोरा प्र.अ., अडावद, घोडगाव, चहार्डी, हिंगोणे, किनगाव बुद्रुक, केहऱ्हाळे बुद्रुक, चिनावल, कुर्डे, कानळदा, आसोदा आणि पिंप्री खुर्द हे गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.

अनुसूचित जाती –

वाघोड, निंभोरा बुद्रुक, वाघोदा बुद्रुक, अंतुर्ली, कंडारी आणि निंभोरा हे गट अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

गटांचे आरक्षण राजकीय समीकरणांवर थेट परिणाम करणार असून अनेक अनुभवी नेते आणि संभाव्य उमेदवारांच्या योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही गटांतील आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात नवीन चेहरे उदयास येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news