Jalgaon Politics | यावलच्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा छाया पाटील यांनी गिरीश महाजन यांची घेतली भेट; राजकीय चर्चांना उधाण

भेटीला राजकीय रंग देऊ नका, विकासकामांबाबत चर्चा
Chhaya Patil Meets Girish Mahajan
ठाकरे गटाच्या नेत्या छाया पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.Pudhari
Published on
Updated on

Yaval Shiv Sena UBT Chhaya Patil Meets Girish Mahajan

जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असताना यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या छाया पाटील यांनी शनिवारी (दि.१३) मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत शनिवारी दुपारी छाया पाटील यांनी जळगाव येथील जीएम फाउंडेशन कार्यालयात जाऊन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक सुमारे एक ते दीड तास चालली.

Chhaya Patil Meets Girish Mahajan
Jalgaon News | नॅशनल हायवेचा रस्ता की शोरूमची खासगी पार्किंग? 'न्हाई'च्या सर्विस रोडवर शोरूमधारकांचा डल्ला

या भेटीनंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना छाया पाटील यांनी भेटीचा संबंध विकासकामांशी असल्याचे सांगितले. रुग्णालयासंदर्भातील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी त्यांचे पती अतुल पाटील यांनीही या भेटीला राजकीय रंग देण्याचे कारण नसल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, यावलमध्ये सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह नगरोत्थान योजनेतील विविध विकासकामांच्या प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली होती.

Chhaya Patil Meets Girish Mahajan
Jalgaon crime news | जळगावात 'विमल'चा बंपर स्टॉक जप्त; एमआयडीसी पोलिसांची डिझो पेट्रोल पंपाजवळ धडक कारवाई

अतुल पाटील म्हणाले की, गिरीश महाजन हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने विकासकामांसाठी त्यांच्याशी संपर्क साधणे स्वाभाविक आहे. पूर्वी आम्ही भाजपमध्ये कार्यरत होतो, मात्र सध्या महाविकास आघाडीबरोबर आहोत. आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही वेगळा निर्णय किंवा आदेश मिळत नाही तोपर्यंत राजकीय भूमिका बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार भाजपचे असल्याने स्थानिक विकासकामे आणि शासकीय योजनांच्या पाठपुराव्यासाठी त्यांच्याशी संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Chhaya Patil Meets Girish Mahajan
Jalgaon Politics नाशिकपाठोपाठ जळगावचाही तिढा सुटला! शिंदेंच्या भेटीनंतर बंडखोर रेश्मा काळेंची माघार; आता तिरंगी लढत

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना पुन्हा एकदा बळ मिळाले असून, आगामी काळात या चर्चांना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news