Unseasonal Rain Jalgaon | अवकाळीने जळगावचा बळीराजा कोलमडला; ४ हजारांहून अधिक शेतकरी संकटात

हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाले
Banana Crop Damage Jalgaon
हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झालेPudhari
Published on
Updated on

Banana Crop Damage Jalgaon

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर निसर्गाने क्रूर घाला घातला. अवकाळी पावसाने ६७ गावांमधील तब्बल ४०४२ शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून हजारो हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

एरंडोल तालुक्याला सर्वाधिक फटका
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा एरंडोल तालुक्याला बसला आहे. एकट्या एरंडोलमध्ये १९४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून ३०६९ शेतकरी बाधित झाले आहेत. भडगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यांनाही मोठा फटका बसला आहे.

Banana Crop Damage Jalgaon
Jalgaon News: जळगावकरांनो पाणी जपून वापरा! हातनूर धरणातील साठा गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटला

मका-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान
अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान मका आणि ज्वारी या पिकांचे झाले आहे.

  • मका : १२५६.५ हेक्टर

  • ज्वारी : १०१९ हेक्टर

  • बाजरी : १५७ हेक्टर

  • केळी : २१ हेक्टर

  • इतर पिके (गहू, कांदा, भाजीपाला) : सुमारे १०० हेक्टर

तालुकानिहाय नुकसानीचा आढावा

  • एरंडोल : ३० गावे, ३०६९ शेतकरी, १९४१ हेक्टर नुकसान

  • भडगाव : ७ गावे, ६८६ शेतकरी, ३६९ हेक्टर

  • मुक्ताईनगर : ११ गावे, ११९ शेतकरी, ९९.५ हेक्टर

  • जळगाव : ९ गावे, १०५ शेतकरी, ७४ हेक्टर

  • जामनेर : ७ गावे, ५४ शेतकरी, ४९ हेक्टर

  • यावल : ३ गावे, ९ शेतकरी, ९ हेक्टर

Banana Crop Damage Jalgaon
Jalgaon Crime News | भुसावळ हादरले! 'गावात कार का आणली?' म्हणत तरुणाला बेदम चोप; मदतीला गेलेल्या पोलिसाचाही शर्ट फाडला

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले असून तलाठी, तहसीलदार व ग्रामसेवकांकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे.

आधीच विविध संकटांनी ग्रासलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस मोठा धक्का ठरला आहे. आता शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news