

जळगाव : पुढारीऑनलाइन डेस्क - चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शुक्रवार (दि.27) सकाळपासून मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली असून शेतकरी चितेंत दिसून येत आहे. जिल्ह्यातील इतर भागातही सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने रब्बी पिकांना धोका संभवत आहे.
शुक्रवार (दि.27) दुपारपासूनच पावसाची सुरुवात होणार असल्याचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यामध्येही पाऊस, गारपीट होण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे.