Jalgaon Accident | पुतणीच्या लग्नाला जाताना दुचाकीला उडविले; पती-पत्नी जागीच ठार

जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगाव जवळ भीषण अपघात
Umala Gadegaon Accident Couple Died
नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली.Pudhari
Published on
Updated on

Umala Gadegaon Accident Couple Died

जळगाव : तालुक्यातील उमाळा-गाडेगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्य यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २५) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली. मुझफ्फर अली सय्यद बबन (वय-६०) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (वय-५५, दोन्ही रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत दांपत्याचे नाव आहे.

Umala Gadegaon Accident Couple Died
Jalgaon Crime News | भुसावळ हादरले! 'गावात कार का आणली?' म्हणत तरुणाला बेदम चोप; मदतीला गेलेल्या पोलिसाचाही शर्ट फाडला

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये मुझफ्फर अली सैय्यद बबन हे आपले पत्नी ताहेराबी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मसाला विक्री करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज त्यांचे चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्या कारणामुळे ते आपल्या पत्नी ताहेराबी यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच १९ इजे ३८९८) जळगाव येथून फर्दापूर येथे गेले होते.

लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळे ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडले. या भीषण अपघातात मुझफ्फर अली सय्यद बबन आणि ताहेराबी मुजफ्फर अली हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता दोघांना मयत घोषित केले.

Umala Gadegaon Accident Couple Died
Jalgaon news | प्रशासनाची महसूल वसुलीत मोठी दमछाक; सरकारी तिजोरीत 'ठणठणपाळ'!

या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news