जळगाव : दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव : दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
Published on
Updated on

जळगाव, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात टोळी करून वेगवेगळे गंभीर गुन्हे करणाऱ्या दोन गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी २ वर्षांकरिता जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. आशुतोष उर्फ आशु सुरेश मोरे (वय 21, रा. एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी) आणि (दीक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय१९, रा, यादव देवचंद हायस्कूल जवळ मेहरून) यांना २ वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात व जिल्ह्यात ठिकठिकाणी दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण वातावरण तयार करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करत होते. त्यांच्यावर एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही.

या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमीन शेख आणि इम्तियाज खान यांनी गुन्हेगार आशुतोष सुरेश मोरे आणि दीक्षांत देविदास सपकाळे या दोघांविरोधात हद्दपार करण्याचे अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केला होता.
त्यानुसार पोलिसांनी दोघांवर हद्दपारचे कारवाई केली. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील दामोदरे यांनी सहकार्य केले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news