जळगाव : उपविभागातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना ‘एम्पलॉयी ऑफ द मंथ’

जळगाव : उपविभागातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांना ‘एम्पलॉयी ऑफ द मंथ’

Published on

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; भुसावळ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमधून त्या महिन्याच्या पाच कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशन एम्पलॉयी ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  उपविभागीय क्राईम आढावा बैठकीत पुष्पगुच्छ व उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.  प्रोत्साहन पर हजार रुपयांचे बक्षीसही देण्यात आले.

भुसावळ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन मधून पोलीस स्टेशन एम्पलॉयी ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात येत आहे उपविभागीय क्राईम बैठकीमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. यामध्ये भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल शेख जावेद शेख मजीद यांनी केस व ड्युटी मध्ये 61 केसेस साजित करून दोष सिद्धी प्रमाण वाढवून उल्लेखनीय कामगिरी केली. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सचिन यशवंत चौधरी यांनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील नऊ मोटरसायकल हस्तगत करून गुन्हा उघडस आणला. तालुका पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी संजय तायडे यांनी गुन्हे निर्गमित संख्या कमी करून गुन्ह्याच्या निफ्टरा व एमपीडीए चे प्रस्ताव तयार करून हायकोर्टात सादर केले. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी हेमंत मिटकरी यांनी क्राईम कामात अद्यावत सीसीटीएनएस प्रणाली फीडिंग मध्ये मदत केली.

वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिनेश पाटील मोटर व्हीकल 308 केसेस केल्या. याबद्दल उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस स्टेशन ऑफ द मंथ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. एवढे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक गजानन पडघम, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण तसेच भुसावळ उपविभागातील सर्व अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news