Jalgaon Theft | रब्बी हंगामाच्या तोंडावर महिलेच्या शेतावर चोरट्यांचा डल्ला; दोन लाखांचे साहित्य लंपास

१० ते १२ चोरट्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रोटाव्हेटर, मोटार आणि बियाणे केले चोरी
Farm Equipment Theft
Farm Equipment Theft Pudhari
Published on: 
Updated on: 

Jalgaon Farm Equipment Theft

जळगाव : रब्बी हंगामाची तयारी सुरू असतानाच सावखेडा शिवारातील एका शेतकरी महिलेच्या शेतावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास १० ते १२ अज्ञात चोरट्यांनी शेतातील ट्रॅक्टर-ट्रॉली, रोटाव्हेटर, स्प्रिंकलर संच, पीव्हीसी पाईप, पाण्याची विद्युत मोटार आणि गव्हाचे बियाणे असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी घडली चोरीची घटना

जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात राहणाऱ्या कल्याणी संजय सापकाळे (वय ४५) यांची सावखेडा शिवारातील गिरणा पंपिंग रोडलगत गट क्रमांक २६३ मध्ये शेती आहे. २२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास १० ते १२ अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात प्रवेश केला. त्यानंतर शेतात ठेवलेले शेतीउपयोगी साहित्य चोरून नेले.

Farm Equipment Theft
Jalgaon Crime News : घोडसगाव शिवारात थरार! भुसावळच्या व्यापाऱ्याला मारहाण करून ५ लाख लुटले

चोरट्यांनी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचा जुना वापरता ट्रॅक्टर व ट्रॉली, १५ हजार रुपये किमतीचा रोटाव्हेटर, १० हजार रुपयांचा स्प्रिंकलर संच, १० हजार रुपयांचे पीव्हीसी पाईप, १० हजार रुपयांचे गव्हाचे बियाणे आणि ५ हजार रुपये किमतीची पाणी उपसण्याची विद्युत मोटार असा एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

तालुका पोलिसांकडून तपास सुरू

शेतातील साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कल्याणी सापकाळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून १० ते १२ अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२), ११५ (२), ३५१ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Farm Equipment Theft
Jalgaon crime news: १० लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७७ लाखांची मागणी; मुद्दल-व्याज फेडूनही सावकाराचा तगादा सुरूच

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश देवरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य चोरीला गेल्याने शेतकरी महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.