Jalgaon crime news: १० लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७७ लाखांची मागणी; मुद्दल-व्याज फेडूनही सावकाराचा तगादा सुरूच

१० लाख ५० हजार रुपयांच्या उसनवारीवर अवाजवी व्याजाचा पाश आवळून तब्बल ७७ लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराचा संतापजनक प्रकार चोपड्यात उघडकीस आला आहे.
crime news
crime newsFile Photo
Published on: 
Updated on: 

Jalgaon crime news

जळगाव : म्हशी खरेदीसाठी घेतलेल्या अवघ्या १० लाख ५० हजार रुपयांच्या उसनवारीवर अवाजवी व्याजाचा पाश आवळून तब्बल ७७ लाखांची मागणी करणाऱ्या सावकाराचा संतापजनक प्रकार चोपड्यात उघडकीस आला आहे. संपूर्ण मुद्दल व व्याजाची परतफेड झाली असतानाही जास्तीच्या पैशांसाठी तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सावकाराविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश शामराव पाटील (वय ५०, रा. मोठा देव्हारा, दीपमाळ मंदिराजवळ, चोपडा) असे या संशयिताचे नाव आहे.

मजरेहोळ (ता. चोपडा) येथील दुग्ध व्यावसायिक भगवान शिवाजी पाटील (वय ४०) यांनी म्हशी खरेदीसाठी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी संशयित राकेश पाटील याच्याकडून १० लाख ५० हजार रुपये उसने घेतले होते. तक्रारदार भगवान पाटील यांनी ठरल्याप्रमाणे संपूर्ण मुद्दल आणि त्याचे व्याज राकेश पाटील याला वेळेत चुकतं केले. तरीही त्याची हाव संपली नाही. त्याने भगवान पाटील यांच्याकडे व्याजापोटी चक्क ७७ लाख रुपयांची मागणी लावून धरली.

crime news
Jalgaon crime news: एरंडोलमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ७ लाखांचा ऐवज लंपास

सततच्या तगाद्यामुळे २९ जून रोजी दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत 'आता कोणतेही देणे बाकी राहिलेले नाही' असा रीतसर समझोता झाला. मात्र, त्यानंतरही राकेश याने अतिरिक्त व्याजाची रक्कम उकळण्यासाठी फिर्यादीला अरेरावी करत जीवे मारण्याच्या धमक्या देणे सुरूच ठेवले. त्याच्या त्रासाला आणि दबावाला कंटाळून फिर्यादीने साक्षीदार प्रल्हाद पाटील यांच्यामार्फत दीड लाख रुपये 'फोनपे'द्वारे तर दीड लाख रुपये रोख, असे एकूण ३ लाख रुपये अतिरिक्त दिले.

तीन लाख रुपये जास्तीचे उकळूनही सावकाराची पैशांची भूक शमली नाही. १५ जुलै रोजी संशयिताने शहरातील निर्मल डेअरी गाठून भगवान पाटील यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास संशयिताने पुन्हा फिर्यादीला फोन करून आणखी १५ लाख रुपयांच्या अतिरिक्त व्याजाची मागणी केली; तसेच पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

अखेर सावकाराच्या या छळाला कंटाळून भगवान पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून संशयित राकेश शामराव पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(४), ३२९(४), १३१, ३५२, ३५१(२) सह सावकारी प्रतिबंधक कायदा कलम ३९ व ४५ अन्वये खंडणी आणि बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी प्रकरणाची दखल घेतली असून, पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी पुढील तपास करीत आहेत. आरोपी अद्याप मोकाट असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

crime news
Jalgaon News : ‘शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्यास गय नाही’; जळगावात बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news