Heatwave Jalgaon | जळगावकरांना उन्हाचे चटके; मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा उसळला

गेल्या वर्षाच्या तुलनेत २ ते ३ अंशांची वाढ; वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा असह्य
Temperature Rise
Temperature RisePudhari
Published on
Updated on

Jalgaon temperature today

जळगाव : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. अवघे नऊ दिवस उलटले असतानाच उन्हाच्या झळा तीव्र होत असून नागरिकांना वैशाखातील उष्णतेची चाहूल लागली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानात सरासरी २ ते ३ अंशांची वाढ नोंदवली गेल्याने दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ आली आहे.

२०२५ व २०२६ मधील तापमानाची तुलना

गेल्या वर्षी ८ आणि ९ मार्च रोजी कमाल तापमान अनुक्रमे ३६ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. मात्र यंदा त्याच कालावधीत तापमान जवळपास ३८ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे यंदा उन्हाचा तडाखा अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होत आहे.

Temperature Rise
Jalgaon Police | जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने गळफास घेऊन जीवन संपविले

६ मार्च: २०२५ मध्ये ३३°C, तर २०२६ मध्ये ३८.५°C — ५.५°C वाढ

७ मार्च: २०२५ मध्ये ३४.३°C, तर २०२६ मध्ये ३८.७°C — ४.४°C वाढ

८ मार्च: २०२५ मध्ये ३६.३°C, तर २०२६ मध्ये ३८.५°C — २.२°C वाढ

९ मार्च: २०२५ मध्ये ३७.५°C, तर २०२६ मध्ये ३८.६°C — १.१°C वाढ

उष्णतेसोबत आर्द्रतेचा त्रास

५ मार्चपासून तापमानाने ३८ अंशांची पातळी ओलांडली असून ते कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास राहिल्याने उकाडा अधिक जाणवत आहे. दिवसभर घामाच्या धारा वाहत असून अंगाची लाहीलाही होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Temperature Rise
Jalgaon theft news | मंत्र्यांच्या 'बालेकिल्ल्यात' चोरट्यांची एन्ट्री; भरदिवसा घरफोडीने जामनेर हादरले

रात्रीचा गारवाही कमी

यंदा किमान तापमानात फारशी घट होत नसल्याने रात्री अपेक्षित गारवा मिळत नाही. त्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळत नसल्याने जळगावकरांना ‘हॉट नाईट्स’चा अनुभव येत आहे.

हवामान तज्ज्ञांकडून तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची भीती

मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने असा वेग घेतल्याने एप्रिल व मे महिन्यात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची भीतीही तज्ज्ञांकडून वर्तवली जात असून प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news