Jalgaon Police | जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने गळफास घेऊन जीवन संपविले

चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथे राहत्या घरी गळफास घेत जीवन संपविल्याने खळबळ
Jalgaon MIDC Police Constable ends life
निलेश पाटील Pudhari
Published on
Updated on

Jalgaon MIDC Police Constable ends life

जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात डीबी रायटर म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथे राहत्या घरी गळफास घेत जीवन संपविल्याची घटना सोमवारी (दि. सकाळी उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश पाटील हे डीबी रायटर म्हणून कार्यरत होते. मूळ चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी असलेले निलेश पाटील शनिवारी गावी एक कार्यक्रमासाठी गेले होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपवले.

Jalgaon MIDC Police Constable ends life
Jalgaon Police Recruitment 2026 | खाकीचं स्वप्न अधुरं! जळगावात मैदानावर 295 जणांची 'दांडी गुल'; 380 तरुण मात्र शर्यतीत कायम

सोमवारी सकाळी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमीत मनेल यांनी भेट दिली असून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा सुरू असून मृताचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे.

निलेश पाटील यांनी आजवर उत्कृष्ट काम केले असून एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. घडलेल्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून अनेकांना धक्का बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news