Jalgaon Temperature | जळगावच्या तापमानात २४ तासांत १ अंशाची वाढ; सुर्यदेव आग ओकू लागल्याने दुपारचा 'कर्फ्यू'

Jalgaon Maximum Temperature | वाढत्या आर्द्रतेमुळे घामाच्या धारा
Temperature Rise
Temperature RisePudhari
Published on
Updated on

Temperature Rise in North Maharashtra

जळगाव: खान्देशातील तापमानाचा पारा आता चांगलाच चढू लागला आहे. जळगाव आता 'भट्टी' होऊ लागली आहे. अवघ्या २४ तासांत कमाल तापमानात १ अंशाची वाढ झाली असून, पारा आता ३९.५°C वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे केवळ उष्णताच नाही, तर हवेतील आर्द्रता (ह्युमिडिटी) वाढल्यामुळे जळगावकर घामाघूम झाले असून अंगाची लाहीलाही होत आहे.

गेल्या दोन दिवसांतील तापमानाची तुलना केली असता, उन्हाची तीव्रता किती वेगाने वाढत आहे हे स्पष्ट होते

२६ मार्च रोजी कमाल तापमान ३८.५°C होते, जे आज २७ मार्च रोजी थेट ३९.५°C वर गेले आहे. म्हणजेच जळगाव आता चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे. केवळ दिवसाच नाही, तर रात्रीच्या तापमानातही तब्बल २.७ अंशांची वाढ झाल्याने रात्रीचा गारवाही गायब झाला आहे. त्यातच हवेतील आर्द्रता ५८ टक्क्यांवरून थेट ७३ टक्क्यांवर गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत असून नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

Temperature Rise
Jalgaon Traffic Police | आकाशवाणी चौकात 'खाकी'चा अजब न्याय; डावी बाजू खुली की बंद? उन्हाच्या तडाख्यात सावली शोधली तरी पडतोय दंड!

वाढत्या उष्म्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. डोक्याला रुमाल, डोळ्यावर चष्मा आणि सोबत पाण्याची बाटली घेतल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत. लिंबू सरबत, उसाचा रस आणि शहाळ्याच्या पाण्याचा आधार घेऊन जळगावकर या उन्हाशी दोन हात करत आहेत.

26 मार्च 2026

Max = 38.5°C

Min = 21.5°C

RH = 58%

27 मार्च 2026

Max = 39.5°C

Min = 24.2°C

RH = 73%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news