Jalgaon Temperature : जळगावचा उन्हाचा 'रुद्र'अवतार; पारा ४५ अंशांच्या पार!

दुपारनंतर रस्ते ओस, उन्हाच्या तीव्र झळांनी जळगावकर अक्षरशः होरपळले
Jalgaon Temperature
Jalgaon Temperature
Published on
Updated on

जळगाव: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा तडाखा आता असह्य होऊ लागला असून, तापमानाने ४५ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी जळगावचे कमाल तापमान ४५.५°C इतके नोंदवण्यात आले, तर किमान तापमान २७.५°C राहिले. हवेतील आर्द्रता ३१ टक्के इतकी खाली आल्याने वातावरणात कमालीचा कोरडेपणा वाढला असून, दुपारच्या वेळी जळगावकरांना जणू आगीच्या ज्वालांचा अनुभव येत होता.

आगीच्या झळा: आज सकाळपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. सकाळी १० वाजेपासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले आहेत

वाहतूक थंडावली: दुपारच्या सुमारास तापमानाचा पारा चढल्याने शहरातील मुख्य रस्ते ओस पडले होते. दुचाकी चालवणे तर अशक्य झाले होते; अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे (लू) वाहनधारकांना सुरक्षित आडोसा शोधावा लागला.

सायंकाळीही दिलासा नाही: एरव्ही सूर्यास्तानंतर हवेत थोडा गारवा जाणवतो, मात्र आज सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा कायम होता. हवेत आर्द्रता कमी असल्याने घामापेक्षा चटके जास्त बसत होते.

Jalgaon Temperature
Jalgaon Temperature : जळगावचा 'पारा' ४३ पार! सुर्यदेव कोपले, जळगावकरांची काहिली

जळगावच्या भौगोलिक स्थितीमुळे मे महिन्यात तापमान वाढणे स्वाभाविक असले, तरी यंदा ४५.५ अंशांपर्यंत गेलेला पारा चिंतेची बाब ठरत आहे. जमिनीत ओलावा नसल्याने आणि शुष्क वारे वाहत असल्याने रात्रीच्या तापमानातही फारशी घट झालेली नाही. परिणामी, रात्रीही उष्णतेचा दाह कायम आहे.

वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. जळगावकरांनी दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे आणि भरपूर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news