Jalgaon Summer Heat | स्वत:ला जपा! वाढता वाढता वाढे पारा; जिल्ह्याचे तापमान गेले 44 अंशावर

तापमान
तापमान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यामध्ये सध्याला सूर्य आग ओकत आहे. सकाळी नऊ वाजेनंतर वाढत्या तापमानामुळे चटके बसत असून लाही लाही होत आहे. सर्वसामान्यांपासून पशुपक्षी जीव जनावरांना उन्हाचा दाह जाणवू लागला आहे. दुपारनंतर तर घराच्या बाहेर पडणे अशक्य झालेले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून 44° ते 45° दरम्यान तापमान सुरू आहे. तापमान 47° पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजही जळगाव जिल्ह्याचे तापमान विविध वेबसाईटवरून वेगवेगळे दाखवण्यात येत आहे. यामध्ये स्कायनेटवर जळगाव चे तापमान हे शनिवारी 49° अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या तापमानापासून जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांची सुटका होईल अशी कोणतीही चिन्हे दिसून येत नाही. सद्य परिस्थितीत सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा साडेसहा पर्यंत उन्हाचे चटके जाणवत आहे. दुपारी या वेळेत काम करणे जवळपास अशक्य झालेले आहे त्यामुळे जागोजागी मानव रहित रस्ते दिसू लागल्याने जणू अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र आहे. तापमानाचा पारा हा जरी 44°- 45° अंशावर असला तरी सकाळी नऊ वाजेपासून उन्हाचे चटके व दाहकता जाणवू लागत आहे.

मामुराबाद हवामान केंद्र
तारीख व तापमान
22 मे – 44°
23 मे 45°
24 मे 46°
25 मे 44°
26 मे 43°

वेलनेस वेदर
22 मे 45°
21 मे  45°

ॲक्यू वेदर
22 मे 44°
23 मे 44°
24 मे 45°
25 मे 44°

स्काय नेट
22 मे 43°
23 मे 44°
24 मे 45°
25 मे 49°
26 मे 49°
27 मे 48°

आय एम डी वेदर
22 मे 44°
23 मे 44°
24 मे 45°
25 मे 45°
26 मे 44°

वाढत्या उन्हाचे चटके व त्याच्या  दाहतेमुळे मानवी जीवनावर तसेच पशुपक्षींच्या जीवनावर दुष्परिणाम होत आहे. ज्या ठिकाणी पाणी, धरण, तलाव आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. याचा सर्वाधिक फटका केळी पिकांना होत असून केळीचे घड माना टाकू लागले आहेत. – निलेश गोरे, हवामान तज्ज्ञ.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news