Student Death Jalgaon | सावखेड्यात वारकरी शाळेत विजेचा धक्का लागून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

जळगाव शहराजवळील सावखेडा शिवारातील वारकरी शाळेतील दुर्घटना
Sawkheda Warkari School Electrocution
चिन्मय सपकाळेPudhari
Published on: 
Updated on: 

Sawkheda Warkari School Electrocution

जळगाव : जळगाव शहराजवळील सावखेडा शिवारातील वारकरी शाळेत विजेचा धक्का लागून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ९) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. चिन्मय मंगेश सपकाळे (वय १४, रा. गोपाळपुरा, जुने जळगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिन्मय हा गेल्या दोन वर्षांपासून सावखेडा शिवारातील गोपाल कैलास मराठे महाराज यांच्या राधाकृष्ण वारकरी संप्रदाय मंडळात वारकरी शिक्षण घेत होता. या ठिकाणी एकूण १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Sawkheda Warkari School Electrocution
Jalgaon Shocking News : अतिक्रमण कारवाईचा भडका! संतापलेल्या रसवंती चालकाने फोडली महापौरांचीच गाडी; जळगाव मनपात थरार!

शाळेच्या परिसरात उघड्यावर बोरिंगची मोटार सुरू होती. त्यावेळी चिन्मयचा पाय विजेच्या वायरमध्ये अडकला आणि इलेक्ट्रिक पिन बाहेर निघाल्याने बोरिंग बंद पडली. बोरिंग पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने चिन्मय पिन जोडण्यासाठी गेला असता त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. यात तो गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

चिन्मयच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली. चिन्मयच्या पश्चात वडील आणि दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे.

Sawkheda Warkari School Electrocution
Jalgaon crime news: १० लाखांच्या कर्जासाठी तब्बल ७७ लाखांची मागणी; मुद्दल-व्याज फेडूनही सावकाराचा तगादा सुरूच

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने वारकरी संप्रदायासह परिसरात शोककळा पसरली आहे. उघड्यावर असलेल्या विद्युत जोडणीच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news