Jalgaon bribe case
लाच घेताना सरपंचासह पंटरला अटक File Photo

जळगाव : १० हजाराची लाच घेताना सरपंचासह पंटरला अटक

घरकुलसाठी उत्तरावर नाव लावण्यासाठी घेतली लाच
Published on

जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. उतारा नावावर नसल्याने उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील सरपंचाने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. शुक्रवारी (दि.२७) संरपचासह त्याच्या खाजगी पंटरला दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६) असे लाचखोर सरपंचाचे नाव आहे.

 Jalgaon bribe case
Dhule News | भाजपाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करणाऱ्या 13 जणांना अटक

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक गावात राहणारे तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. परंतु तक्रारदार हे ज्या जागेवर राहत होते, ती जागा त्यांच्या नावावर नव्हती. त्यामुळे गाव नमुना आठमध्ये तक्रारदाराचे नाव लावण्यासाठी ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच अनिल पाटील याने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता सरपंच अनिल विश्राम पाटील यांनी सदर काम करून देण्याचे बदल्यात १० हजाराच्या लाचेची मागणी करून लाचेची रक्कम बलराम हेमराज भिल (वय ४६) खाजगी इसम यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सरपंचाच्या सहमतीने दहा हजाराची लाच स्विकारताना बलराम भिल या खाजगी इसमाला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक नैत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोहेकॉ रविंद्र घुगे, सुनिल वानखेडे, शैला धनगर, पोना किशोर महाजन , बाळू मराठे यांनी केली.

 Jalgaon bribe case
नागपूर : चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news