Dhule News | भाजपाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करणाऱ्या 13 जणांना अटक

शिरपूर पोलिसांची कारवाई
13 people arrested for attacking BJP taluk president
भाजपाच्या तालुकाध्यक्षावर हल्ला करणाऱ्या 13 जणांना शिरपूर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून सापळा रचून अटक केली. Pudhari Photo
Published on
Updated on

धुळे : शिरपूर तालुक्यातील वाघाडीचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष किशोर माळी यांच्यासह तिघांवर यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या 13 संशयितांना अखेर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून सापळा रचून अटक केली आहे.

वाघाडी गावात बसस्टॅण्ड जवळील पानटपरीजवळ व ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सार्वजनिक जागी अनिल वेडु खलाणे, सुनील शालीकराव माळी व वाघाडी गावाचे सरपंच किशोर विठ्ठल माळी यांना वाघाडी येथील उपसरपंच जगदीश रघुनाथ कोळी, यांच्यासह आलेल्या लोटन शामराव कोळी, बावु उर्फ रामप्रसाद सुकनंदन कोळी, समाधान भरत कोळी, किरण भरत कोळी, राज भरत कोळी, अजय रविंद्र कोळी, किरण बाजीराव कोळी,राहुल दत्तु कोळी, निलेश दिलीप कोळी, विशाल उर्फ अविनाश अशोक कोळी, जयेश प्रविण कोळी, धिरज कोळी, रविंद्र भिका कोळी व इतर ५ ते ६ जणांनी यापूर्वी दाखल केलेल्या केसेसचा राग मनात धरुन वाद घातला. जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉड, तलवारी, काठ्या अशा हत्यारांनी त्यांचेवर हल्ला चढवुन त्यांना मारहाण करुन गंभीर दुखापती करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

13 people arrested for attacking BJP taluk president
धुळे : शिरपूरमध्ये गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा; मिळून आलेली शेती वनविभागाची?

या घटनेमुळे आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी नागरिकांनी मागणी केली. त्यानुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के के पाटील यांनी पथकाला संबंधितांना अटक करण्यासाठी रवाना केले. त्यातील एका पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर राहुल दत्तु कोळी व विशाल उर्फ अविनाश अशोक कोळी यांना वाघाडी गावात सापळा लावून अटक केली आहे.तर लोटन शामराव कोळी व रविंद्र भिका कोळी हे दोन्ही खेतीया येथे आहेत. अशी माहिती मिळाली. त्यावरुन खेतिया येथून या दोघा आरोपींना पथकाने अटक केली आहे. तसेच हल्लेखोर जगदीश रघुनाथ कोळी, दादु उर्फ रामप्रसाद सुकनंदन कोळी, समाधान भरत कोळी, राज भरत कोळी, निलेश दिलीप कोळी, जयेश प्रविण कोळी, रोहीत उर्फ धिरज शरद कोळी, गुलाब सुरेश कोळी, धनराज सोमा कोळी यांना वाघाडी गावाजवळ शहादा रोडलगत असलेल्या शेतातून अटक केली आहे.

जनतेमधून हल्ल्याचा रोष

वाघाडी गावाचे सरपंच किशोर विठ्ठल माळी हे ग्रामपंचायत कार्यालयात हजर असतांना त्यांच्यावर हल्ला चढवुन आरोपींनी लोखंडी रॉड, लाठया- काठ्यांनी वार करुन त्यांना गंभीर दुखापती करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला. त्यामुळे आरोपींविषयी वाघाडी तसेच इतर गावातील व शिरपुर शहरातील लोकांमध्ये चिड निर्माण होवुन नागरीकांनी पोलीस ठाण्यासमोर निषेध मोर्चा आणुन निषेध व्यक्त करुन एक प्रकारे आरोपी पकडण्याचे पोलीसांसमोर आव्हान उभे केले. त्यामुळे पोलीसांनी संशयितांचा शोध घेवून शिताफीने त्यांना ताब्यात घेतले आहे.

13 people arrested for attacking BJP taluk president
Pune Crime | पुणे जिल्हा हादरला! जिन्यातून फरफटत नेत ८५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news