HSC Exam Copy Case | ११ विद्यार्थी कॉपी करताना सापडले; पण अडीच तासांत अहवालातून 'गायब'! रावेरच्या 'त्या' परीक्षा केंद्रावर नेमके घडले काय?

HSC Exam Jalgaon | भरारी पथकाच्या कारवाईवर केंद्र संचालकांकडून बोळा | सीईओ मीनल करनवाल यांचा दणका; खुलासा सादर करण्याचे आदेश
Raver exam center copy case
Raver exam center copy casePudhari
Published on
Updated on

Raver exam center copy case

जळगाव : राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून जळगाव जिल्ह्यात मात्र शिक्षण विभागाचा अजब आणि संशयास्पद कारभार समोर आला आहे. रावेर येथील एका परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने तब्बल ११ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले. मात्र, या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्या अधिकृत अहवालात जिल्ह्यात 'एकही कॉपी केस नाही' (निरंक) असा जावईशोध लावण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून "कोणाच्या आशीर्वादाने हे 'शून्य' पाढे वाचले गेले?" असा सवाल उपस्थित होत आहे.

कारवाईचा असा झाला 'बोंबाबोंब'

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने अचानक तपासणी केली. यावेळी पथकाला तब्बल ११ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य मिळून आले. पथकाने या ११ जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया पूर्ण करून तशी माहिती केंद्र संचालकांकडे सोपवली. नियमानुसार, ही माहिती तातडीने बोर्डाकडे जाणे अपेक्षित होते.

Raver exam center copy case
HSC Exam: आई कुठं शोधू तुला..., घरात आईचं पार्थिव, तरीही लेकीनं दिला बारावीचा पेपर

अडीच तासांत 'अर्थ'पूर्ण बदल?

धक्कादायक बाब म्हणजे, भरारी पथकाच्या कारवाईनंतर अवघ्या अडीच तासांत नाशिक बोर्डाच्या वतीने जिल्ह्याचा सुधारित अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जळगाव जिल्ह्यात एकही कॉपी केस झाली नसल्याचे (निरंक) नमूद करण्यात आले होते. भरारी पथकाने पकडलेले ते ११ विद्यार्थी आणि त्यांच्यावरील कारवाईची कागदपत्रे अडीच तासांत गायब झालीच कशी? असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती लपवली की बोर्डाच्या स्तरावर काही 'अदृश्य' हालचाली झाल्या, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सीईओ करनवाल ॲक्शन मोडमध्ये!

हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करनवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र संचालकांनी ही माहिती वरिष्ठांपर्यंत का पोहोचवली नाही आणि अहवालात 'निरंक' कशी दाखवली, याबाबत संबंधित केंद्र संचालकांकडे लेखी खुलासा मागवण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news