रेल्वे स्टाफच्या सतर्कतेमुळे ग्वाल्हेरचा मुलगा भुसावळ स्टेशनवर सापडला

Jalgaon News | चाइल्ड केअर सेंटरच्या ताब्यात मुलगा
Gwalior boy found Bhusawal railway station
भुसावळ रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या ग्वाल्हेरच्या मुलाला चाइल्ड केअर सेंटरच्या ताब्यात देण्यात आले. Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : घरी कोणालाही न सांगता निघून आलेला मुलगा झेलम एक्सप्रेस मध्ये मुख्य तिकीट निरीक्षक यांना रडताना दिसला. त्याची चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितल्यानंतर भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाकडे त्याला सुपूर्त केले. त्यानंतर मुलाच्या ग्वाल्हेर येथील घरच्यांना याची माहिती देण्यात आली. (Jalgaon News)

याबाबत मध्य रेल्वे भुसावळ यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, झेलम एक्सप्रेसमध्ये (11078) गुरूवारी (दि. ५) मुख्य तिकीट निरीक्षक आर. के. केशरी काम करीत होते. कोच संख्या S5 मध्ये एक लहान बालक रडताना पहिला. तात्काळ त्या मुलाची चौकशी केल्यानंतर मुलगा ग्वाल्हेर येथून आपल्या कुटुंबियांना न सांगता घरुन निघाला आहे आणि मुलाकडे कोणतेही तिकीट नव्हते.

मुलाची स्थिती पाहून आणि त्याला विश्वासात घेऊन आर. के. केशरी यांनी त्याच्याकडून माता-पित्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याच्याशी संपर्क साधला. मुलाच्या आई वडिलांना त्यांचा मुलगा सुरक्षित आहे आणि त्यांना आश्वस्त करण्यात आले.

भुसावळ स्टेशनवर रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) च्या मदतीने, मुलाला चाइल्ड केअर सेंटरमध्ये सुपुर्द करण्यात आले. गाडीमध्ये तिकीट चेकिंग स्टाफच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या मुलाला आपल्या कुटुंबाशी भेट घडून आणण्यात यशस्वी झाले.

Gwalior boy found Bhusawal railway station
जळगाव : घरकाम करत असताना वीजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news