जळगाव : घरकाम करत असताना वीजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू

जळगाव : घरकाम करत असताना वीजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यू
jalgaon News
घरकाम करत असताना वीजेच्या धक्क्याने युवतीचा मृत्यूfile photo
Published on
Updated on

जळगाव : विजेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवार (दि.5) रोजी घडली. याप्रकरणी सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रंजिता राहूल सोनार (वय २४, रा. सोमानी गल्ली, पिंप्राळा, जळगाव) ही युवती कुटुंबासह हरिविठ्ठल नगरात सोमाणी गल्लीत वास्तव्याला होती. गुरूवारी (दि.5) रोजी घरी काम करत असतांना तिला अचानक इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तातडीने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी युवतीस मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news