

जळगाव : भुसावळ उपविभाग अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांचा गौरव करण्यासाठी “पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. मार्च 2025 या महिन्यासाठी निवड झालेल्या अंमलदारांचा नुकताच क्राईम आढावा बैठकीत प्रशस्तीपत्रासह रोख रक्कम देऊन प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
“पोलीस स्टेशन टॉप कॉप ऑफ द मंथ” हा उपक्रम पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. यामागील उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणे व उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळावी असा आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पाच अंमलदारांचा सत्कार करण्यात आला.
भुसावळ शहर पोलीस ठाणे: पोलीस कॉन्सटेबल कुणाल विठ्ठल सोनवणे
भुसावळ बाजारपेठ पो.ठा.: सहायक फौजदार युवराज दौलत नागरुत
भुसावळ तालुका पो.ठा.: पोलीस हेड कॉन्सटेबल संजय काशिनाथ भोई
नशिराबाद पोलीस ठाणे: पोलीस हेड कॉन्सटेबल योगेश नाना वराडे
वाहतूक शाखा, भुसावळ: पोलीस हेड कॉन्सटेबल अजय लक्ष्मण भोंबे
या अंमलदारांनी नागरिकांशी सौजन्याने वागणे, गुन्ह्यांचा कौशल्याने तपास करणे, दोषसिद्धीचे प्रमाण वाढवणे तसेच पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी दिलेली सेवा लक्षणीय ठरली आहे. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक, आसाराम मनोरे, सहायक पोलीस निरीक्षक उमेश महाले तसेच भुसावळ उपविभागातील सर्व दुय्यम अधिकारी व 60 पोलीस अंमलदार उपस्थित होते.