Rto Action Jalgaon | जळगावात अल्पवयीन चालकांवर बडगा; २४ जणांवर कारवाई, सव्वा लाखांहून अधिक दंड

२४ अल्पवयीन चालकांवर कारवाई, पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलावून समज
Jalgaon Traffic Fine Minor Driving
अल्पवयीन वाहनचालकांविरोधात जळगाव वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केलीPudhari
Published on
Updated on

Jalgaon Traffic Fine Minor Driving

जळगाव : शहरातील महाविद्यालय परिसरात भरधाव वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आणि टवाळखोरी करणाऱ्या अल्पवयीन वाहनचालकांविरोधात जळगाव वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई केली. या मोहिमेत २४ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.

महाविद्यालये सुरू व सुटण्याच्या वेळेत वाढणारी वाहतूक कोंडी, विनापरवाना वाहन चालविणे आणि बेदरकार वाहनचालकांमुळे होणारे अपघात रोखण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ११९ ई-चलन जारी करण्यात आले.

Jalgaon Traffic Fine Minor Driving
Jalgaon weather update : जिल्ह्यात अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट'! पुढील २४ ते ४८ तास धोक्याचे, जिल्हा प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

१.४७ लाखांचा दंड; ८२ हजारांची जागेवर वसुली

या विशेष मोहिमेत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ लाख ४७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ८२ हजार रुपये जागेवरच वसूल करण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे महाविद्यालय परिसरातील नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.

ही कारवाई प्रोबेशनरी उपविभागीय पोलीस अधीक्षक सह्याद्री बिरसे आणि प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Jalgaon Traffic Fine Minor Driving
Jalgaon Crime | जळगाव - बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेलगत एलसीबीची धाड; अश्लील वर्तन केल्याप्रकरणी १३ पुरुष, १० महिलांना अटक

शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी महाविद्यालय परिसरासह प्रमुख मार्गांवर यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news