Jalgaon Crime | चंदीगडला जाणारा ४ लाखांचा टरबूज परस्पर विकून चालक पसार; पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा

भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथील व्यापाऱ्याची फसवणूक
 Crime News
Crime News Pudhari file photo
Published on
Updated on

Jalgaon watermelon theft truck driver

जळगाव : पाचोरा तालुक्यातील नगर देवळा येथून चंदीगडला विक्रीसाठी पाठवलेला सुमारे ४ लाख २० हजार रुपयांचा टरबूज माल ट्रक चालकाने परस्पर विकून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजस्थानमधील चालकाविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.

भडगाव तालुक्यातील पळासखेडा येथील व्यापारी भरत हरी वंजारी (वय २७) यांनी नगर देवळा येथील शेतकरी योगेश पाटील यांच्याकडून टरबुजांची खरेदी केली होती. हा माल पंजाबमधील चंदीगड येथे पाठवण्यासाठी त्यांनी अहिल्यानगर येथील ‘काजिम ट्रान्सपोर्ट’चे मालक काजिम शेख यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार राजस्थानमधील टाटा कंपनीचा १२ चाकी ट्रक (क्रमांक RJ 04 GA 1072) व चालक हासिम भाई याला मालवाहतुकीसाठी पाठवण्यात आले.

 Crime News
Jalgaon Crime | विद्यामंदिरात 'वासनांध' नराधम! विद्यार्थिनीचे ३ वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला भरचौकात धु धु धुतले!

१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी नगर देवळा येथून टरबुजे ट्रकमध्ये भरून चंदीगडकडे रवाना करण्यात आली. मात्र, हा माल गंतव्यस्थानी पोहोचवण्याऐवजी चालकाने तो दुसरीकडेच विकून टाकला. यात टरबूजांचा सुमारे ३ लाख रुपयांचा माल आणि १ लाख २० हजार रुपये वाहतूक भाडे, असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा आर्थिक फटका व्यापाऱ्याला बसला.

७ एप्रिल रोजी सायंकाळी भरत वंजारी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चालकाने विश्वासघात करून मालाची विल्हेवाट लावल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निवृत्ती दशरथ मोरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news