Jalgaon Crime | विद्यामंदिरात 'वासनांध' नराधम! विद्यार्थिनीचे ३ वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला भरचौकात धु धु धुतले!

​धरणगाव हादरले; नराधम राहुल अहिरेवर बलात्कार आणि 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल
Dharangaon teacher sexual harassment minor student
Dharangaon teacher sexual harassment minor studentPudhari
Published on
Updated on

Dharangaon teacher sexual harassment minor student

जळगाव : गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना धरणगाव शहरात उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे गेल्या तीन वर्षांपासून लैंगिक शोषण करणाऱ्या वासनांध शिक्षकाला पीडित मुलगी आणि तिच्या संतप्त नातेवाईकांनी भरचौकात काठीने बेदम चोप दिला. या नराधम शिक्षकाला जमिनीवर उलटे झोपवून त्याचे धिंडवडे काढण्यात आले. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

धक्कादायक: ३ वर्षांपासून 'ब्लॅकमेलिंग'चा खेळ!

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल अहिरे असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे. त्याने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो गेल्या तीन वर्षांपासून या मुलीवर अत्याचार करत होता. शिक्षकाच्या जाचाला आणि या लैंगिक शोषणाला कंटाळलेल्या पीडित मुलीने अखेर घरच्यांना हा प्रकार सांगितला.

Dharangaon teacher sexual harassment minor student
Jalgaon crime | नवोदय विद्यालयाच्या विहिरीत अनोळखी मृतदेह; भुसावळात खळबळ

भरचौकात काढले धिंडवडे!

शिक्षकाचे नीच कृत्य समोर येताच पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या नातेवाईकांचा संयम सुटला. त्यांनी राहुल अहिरेला गाठून भरचौकात काठीने झोडपून काढले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पीडित मुलगी स्वतः या नराधमाला काठीने मारहाण करताना दिसत आहे. संतापाचा हा उद्रेक पाहून परिसरातील नागरिकही अवाक झाले.

पोलीस कारवाई आणि अटक

या घटनेनंतर धरणगाव पोलीस ठाण्यात पीडितेच्या तक्रारीवरून राहुल अहिरेविरुद्ध बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने हालचाली करत नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news