Jalgaon Crime : ५ हजारांच्या स्टॅम्पसाठी मागितले ५५०० रुपये, सरकारी स्टॅम्पवर ‘खाजगी’ डल्ला मारणारे संघवी बंधू जेरबंद

पाचोऱ्यात एसीबीची कारवाई; अतिरिक्त वसुली करणाऱ्या संघवी बंधूंना रंगेहात अटक
Pachora  Stamp Vendor Fraud
Pachora Stamp Vendor FraudPudhari
Published on
Updated on

Pachora Stamp Vendor Fraud

जळगाव : शासकीय दरापेक्षा जादा पैसे घेऊन स्टॅम्प पेपर विक्री करणाऱ्या पाचोरा येथील अधिकृत स्टॅम्प विक्रेत्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत त्याला आणि त्याच्या भावाला रंगेहात अटक केली. ५०० रुपयांच्या १० स्टॅम्पसाठी ५,००० ऐवजी ५,५०० रुपये मागून अतिरिक्त ५०० रुपये स्वीकारताना योगेश संघवी व त्याचा भाऊ प्रशांत संघवी यांना एसीबीने जेरबंद केले. या कारवाईमुळे परिसरातील गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घडलेला प्रकार असा
तक्रारदाराला वैयक्तिक कामासाठी ५०० रुपयांचे १० स्टॅम्प आवश्यक होते. त्यासाठी १५ मार्च रोजी त्यांनी जामनेर रोडवरील एका झेरॉक्स केंद्रात भेट दिली. तेथे अधिकृत विक्रेता योगेश संघवी याने प्रत्येक स्टॅम्पसाठी ५५० रुपये मागितले. शासकीय दराबाबत विचारणा केली असता, ठरलेली रक्कमच द्यावी लागेल, असे सांगत त्याने जादा रक्कम घेण्यावर ठाम भूमिका घेतली. कागदपत्रांच्या कारणावरून त्या दिवशी व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.

Pachora  Stamp Vendor Fraud
Jalgaon Crime | जळगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट! शनिपेठ पोलीस ठाण्यातच माजी नगरसेवकाला चोप; पोलिसांचा 'वचक' संपला का?

सापळा रचून कारवाई
तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर १७ मार्च रोजी एसीबीने सापळा रचला. तक्रारदार पुन्हा स्टॅम्प खरेदीसाठी गेल्यावर योगेश संघवी याने पुन्हा ५,५०० रुपयांची मागणी केली. अधिकृत ५,००० रुपयांव्यतिरिक्त ५०० रुपयांची लाच त्याचा भाऊ प्रशांत संघवी याने स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना पकडले. कारवाईदरम्यान ५०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

गुन्हा दाखल
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून योगेश ईश्वरलाल संघवी (वय ४९, अधिकृत स्टॅम्प वेंडर) , प्रशांत ईश्वरलाल संघवी (वय ५३, दोघे रा. विवेकानंद नगर, भडगाव रोड, पाचोरा) यांना अटक केली आहे.

Pachora  Stamp Vendor Fraud
Jalgaon crime news | जळगावच्या ६ सराईत गुन्हेगार एका वर्षासाठी 'हद्दपार'!


ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे, जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो.अं. बाळू मराठे, भूषण पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रिमला नवघरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news