Jalgaon Crime | वाळू वाहतुकीवरील कारवाईचा राग; पाचोऱ्यात मंडळ अधिकाऱ्याच्या घरासमोर मध्यरात्री राडा

गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्याने अधिकाऱ्याला धमकी; तुषार पाटीलसह ७ ते ८ अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

Pachora Sand Transport Crackdown

जळगाव : गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध गौण खनिज (वाळू) उपसा व वाहतुकीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून काही जणांनी पाचोऱ्याचे मंडळ अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी रामचंद्र दशरथ पाटील यांच्या घरासमोर मध्यरात्री गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास भवरलाल नगर परिसरात हा प्रकार घडला.

या प्रकरणी रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात तुषार नारायण पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) याच्यासह ७ ते ८ अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Jalgaon Bribe News : जामनेर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला २५ हजारांची लाच घेताना पकडले!

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुरंगी परिसरातील गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी रामचंद्र पाटील यांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त केली होती.

या कारवाईनंतर २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री संशयित तुषार पाटील हा ७ ते ८ अनोळखी साथीदारांसह रामचंद्र पाटील यांच्या भवरलाल नगर, प्लॉट क्रमांक ६ येथील निवासस्थानी पोहोचल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वेळी संबंधितांनी घरासमोर जमाव करून अधिकाऱ्याला उद्देशून धमकीवजा वक्तव्ये केली तसेच शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मध्यरात्री घरासमोर झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार विसपुते करीत आहेत. रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या महसूल अधिकाऱ्याच्या निवासस्थानी मध्यरात्री जाऊन धमकी व गोंधळ घातल्याच्या या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news