Jalgaon News : मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा – सुनिल पाटील

Jalgaon News : मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा – सुनिल पाटील
Published on
Updated on

जळगाव : महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३ दोन टप्प्यांमध्ये जाहीर केलेली असून पहिल्या टप्प्यात ही योजना १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील नोंदणीकृत /अनोंदणीकृत निष्पादीत दस्तऐवजांसाठी देय असणा-या मुदांक शुल्कापेक्षा कमी शुल्क भरुन झालेले दस्तऐवजांना होणा-या वसुलीस पात्र मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडाला लागु केलेली आहे.

पहिल्या टप्प्यांमध्ये सदर योजना १ डिसेबर २०२३ ते ३१ जानेवारी-२०२४ पर्यत असून त्यात मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड मध्ये भरगोस सूट/ माफी देण्यात आलेली आहे तरी मुद्रांक शुल्क व दंड सूट/माफी योजनेचा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.

 ज्यांच्या 7/12 उता-यावर इतर अधिकारामध्ये मुद्रांक शुल्काचे बोजे बसविण्यात आलेले आहेत त्यांनी तालुक्याच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा. या योजनेचा लाभ पहिल्या टप्पयात ३१ जानेवारी २०२४ पर्यत घेऊन भविष्यात होणा-या महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ४६ (महाराष्ट्र जमीन महसुल संहिता १९६६ च्या कलम १७६ नुसार) वसुली कायद्यानुसार नागरिकांना सक्तीची कारवाई टाळण्याची ही संधी नागरिकांना उपलब्ध झालेली आहे. तरी मुद्रांक शुल्क व दंड देय असणा-या नागरिकांनी त्वरीत सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी जळगांव, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पहिला मजला किंवा नजिकच्या दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news