Education jalgaon news: जीर्ण इमारतीत शिक्षणाचा धोकादायक प्रवास; शेलवडच्या शाळेसाठी माजी विद्यार्थ्याचे उपोषण

​शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश; आठ वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासनाला जाग नाही
Education jalgaon news: जीर्ण इमारतीत शिक्षणाचा धोकादायक प्रवास; शेलवडच्या शाळेसाठी माजी विद्यार्थ्याचे उपोषण
Published on
Updated on

​जळगाव : बोदवड तालुक्यातील शेलवड येथील बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाच्या रखडलेल्या नवीन इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू व्हावे, या मागणीसाठी शिक्षण विभागाच्या कुंभकर्णी झोपेविरुद्ध माजी विद्यार्थी राकेश कडू बोरसे यांनी २५ ऑगस्टपासून शाळेसमोरच बेमुदत आमरण उपोषण पुकारले आहे. तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेला अद्याप हक्काची इमारत न मिळाल्याने स्थानिक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उद्वेगजनक नमुना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Education jalgaon news: जीर्ण इमारतीत शिक्षणाचा धोकादायक प्रवास; शेलवडच्या शाळेसाठी माजी विद्यार्थ्याचे उपोषण
Jalgaon crime news: कारागृहाच्या भिंतीवर चढून फटाके फोडणे भोवले; वाढदिवसासाठी केला प्रकार, दोघांना अटक

शेलवड येथे सन १९९० मध्ये या माध्यमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र, तीन दशकांहून अधिक काळ उलटूनही शाळेच्या इमारतीची वीट रचली गेलेली नाही. संस्थेने शाळेच्या इमारतीसाठी जागा देऊनही बरीच वर्षे लोटली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि हक्काचे मैदान मिळावे, यासाठी माजी विद्यार्थी राकेश बोरसे मागील ८ ते १० वर्षांपासून सातत्याने प्रशासकीय दरबारी खेटे मारत आहेत. मात्र, शिक्षण विभाग आणि अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत विद्यार्थ्यांचे भवितव्य अडकून पडले आहे.

Education jalgaon news: जीर्ण इमारतीत शिक्षणाचा धोकादायक प्रवास; शेलवडच्या शाळेसाठी माजी विद्यार्थ्याचे उपोषण
Jalgaon Crime News: अत्रावलमधील मारहाण प्रकरणात फरार पोलीस शिपाई अखेर खाकीच्या तावडीत

केवळ आश्वासनांची खैरात आणि टोलवाटोलवीला कंटाळून अखेर बोरसे यांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी त्यांनी शाळेसमोरच ठाण मांडत आमरण उपोषण सुरू केले आहे. "शिक्षण हा आमचा हक्क आहे; न्याय मिळेपर्यंत आणि नव्या इमारतीचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील," असा आक्रमक इशारा राकेश बोरसे यांनी प्रशासनाला दिला आहे. या उपोषणामुळे बोदवड तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता तरी झोपेचे सोंग घेतलेल्या शिक्षण विभागाला जाग येणार का? आणि विद्यार्थ्यांच्या हक्काच्या इमारतीचा वनवास संपणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news