Jalgaon News : साप गेल्यावर लाठी मारणारे शनीपेठ अधिकारी?

हद्दपार आरोपीची धिंड काढून पोलिसांनी काय साधले?
जळगाव : जळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
जळगाव : जळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
Published on
Updated on

जळगाव : जळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. रविवार (दि.9) रोजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हद्दपार आरोपीने गोळीबार करून तीन जणांना जखमी केले. उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, हद्दपार असूनही हा आरोपी पोलिसांच्या नजरेसमोर फिरत होता आणि गुन्ह्यानंतरही तो चार दिवस पकडला गेला नाही.

१३ नोव्हेंबरला उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने मुख्य आरोपी आकाश उर्फ टपऱ्या युवराज कोळी याला अटक केली. त्यानंतर शनिपेठ पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदारांची हद्दीतून धिंड काढली. निरीक्षक कावेरी कमलाकर आणि सहायक निरीक्षक साजिद मंजुरी यांच्यासह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

जळगाव : जळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे.
Kumbh Mela 2027 | कुंभमेळा २०२७: जळगाव प्रशासन 'मिशन मोडवर': रेल्वे, विमानतळ, महामार्गांवर विशेष लक्ष

या कृतीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपी हद्दपार असताना तो मुक्तपणे फिरत होता, तेव्हा स्थानिक पोलिसांचे लक्ष का गेले नाही? गोळीबारासारख्या गंभीर घटनेनंतरही चार दिवस आरोपी पकडला गेला नाही, हे गंभीर अपयश मानले जात नाही काय? आता आरोपीला अटक झाल्यावर त्याची धिंड काढण्यामागे स्थानिक पोलिसांनी आपलेच अपयश झाकण्याचा प्रयत्न केला का, अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे.

गुन्हेगारांना जरब बसणे गरजेचे असले, तरी ती गुन्हा घडण्यापूर्वी सक्रिय आणि प्रभावी पोलिस कामगिरीमुळे बसली पाहिजे. निष्क्रीयतेनंतर काढलेली ही धिंड नागरिकांना समाधान देत नाही. जळगावातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दैनंदिन गस्त, चौकशी आणि प्रतिबंधात्मक कारवाईकडे जास्त लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news