Jalgaon News | जळगावातील ग्राम सडक कार्यालय सापडेना

कार्यालय शोधण्याची आली वेळ
Jalgaon Gram Sadak karyalay
जळगावातील ग्राम सडक कार्यालय अदृश्यवासात असून ते कुणालाही सापडत नाही.File Photo
Published on
Updated on

नरेंद्र पाटील

जळगाव : जळगाव जिल्ह्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे करण्यासाठी ज्या कार्यालयाची आवश्यकता आहे ते कार्यालय सध्या शोधण्याची वेळ आली आहे. कारण ते कार्यालय सर्वसामान्य नागरिकांना लवकर सापडेल अशा ठिकाणी नाही. किंवा त्या कार्यालयाचा बोर्डही नाही. ठेकेदार अधिकारी व संबंधित व्यक्तींनाच ते कार्यालय सापडू शकते अशा ठिकाणी ते कार्यालय शहरात आहे. कार्यालय सापडले तरी अधिकारी हे दौऱ्यावरच असतात. त्यामुळे भिंतीशी बोलावे लागत असल्यासारखी स्थिती आहे.

Jalgaon Gram Sadak karyalay
जळगाव : नाना पटोले हे माझे दैवत! पाय धुणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याने दिले थेट उत्तर

कार्यालय अदृश्यवासात

राज्याने व केंद्राने ग्रामीण भागात व शहरांमध्ये अंतर कमी करण्यासाठी पंतप्रधान सडक योजना व ग्राम मुख्यमंत्री सडक योजना या योजना सुरू केल्या आहे. यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय सुरु करण्यात आले आहे. मात्र जळगाव जिल्ह्यातील कार्यालय हे अदृश्यवासात ठेवण्यात आलेले आहे.

दिशादर्शक फलक नाही

हे कार्यालय ज्या ठिकाणी व ज्या रस्त्यात म्हणजे सिंधी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे मात्र या ठिकाणी कोणताही कार्यालयाचा बोर्ड किंवा मार्ग दाखवण्यासाठी दिशादर्शक चिन्ह ठेवण्यात किंवा लावण्यात आलेले नाही. सदरचे ग्राम सडक योजनेचे कार्यालय हे फक्त ठेकेदार संबंधित अधिकारी कर्मचारी व त्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या लोकांना सापडेल अशा ठिकाणी ते सुरू करण्यात आले आहे.

Jalgaon Gram Sadak karyalay
जळगाव : एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्याची भेट

कार्यालयात एक-दोन जणच

या ग्रामसडक योजनेचे अभियंता संजय राठोड हे इतके दौऱ्यात व्यस्त असतात की कार्यालयात सापडतच नाही. आज दि. 24 रोजी कार्यालयाला दुपारी दीड वाजता अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले असता कार्यालयात एक -दोन जण सोडल्यास कोणीही उपस्थित नव्हते. अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणतेही उत्तर मिळत नाही. किंवा प्रतिसाद मिळत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news