जळगाव : नाना पटोले हे माझे दैवत! पाय धुणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याने दिले थेट उत्तर

जळगाव : नाना पटोले हे माझे दैवत! पाय धुणाऱ्या ‘त्या’ कार्यकर्त्याने दिले थेट उत्तर

Nana Patole : नाना पटोले  यांचे पाय धुणारा कार्यकर्ताच समोर आला आणि राेखठोक प्रतिक्रीया देऊन विरोधकांची बोलती बंद केली आहे. पटोले यांचे पाय धुणारा कार्यकर्ता हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड गावाचा आहे. विजय गुरव असे त्याचे नाव असून तो काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता असून तो पटोले यांच्या सेवेत कायम असतो.

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अकोला येथे कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नान पटोले हे अकोला जिल्ह्यातील वाडेगावात गेले होते. यावेळी त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पावसाळ्याचे दिवस असल्याने पटोले यांना चिखलातून जावे लागले. जात असताना त्यांचे पाय चिखलाने माखल्याने विजय गुरव या कार्यकर्त्याने त्यांच्या पायावर पाणी टाकले. हा व्हिडीओ समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावले अशी टिका झाली. हा सर्व गोंधळ सुरू असताना पाय धुणारा कार्यकर्ता समोर आला असून त्याने थेट प्रतिक्रीया दिली आहे. त्याच्या या प्रतिक्रीयेनंतर विरोधकांची बोलती बंद होणार आहे.

जळगाव : जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, केतकी पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखाताई वर्मा, डॉक्टर राधेश्याम चौधरी, अमित भाटिया आदींनी या जोडे मारो आंदोलनात सहभाग घेऊन निषेध नोंदवला.
जळगाव : जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, केतकी पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखाताई वर्मा, डॉक्टर राधेश्याम चौधरी, अमित भाटिया आदींनी या जोडे मारो आंदोलनात सहभाग घेऊन निषेध नोंदवला.

जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा, केतकी पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखाताई वर्मा, डॉक्टर राधेश्याम चौधरी, अमित भाटिया आदींनी या जोडे मारो आंदोलनात सहभाग घेऊन निषेध नोंदवला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेतले. त्यांच्या या कृतीच्या विरोधात बुधवार (दि.१९) रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा महिला मोर्चा व युवा मोर्चाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घेतल्या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनही करण्यात आले.

मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सोमवारी अकोला बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे नियोजित कार्यक्रम होता. त्याच वेळेस शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी ही वाडेगावात मुक्कामी होती. पालखीचे दर्शन घेण्यासाठी पटोले हे चिखलातून त्या ठिकाणी पोहोचले. दर्शन घेतल्यानंतर ते परतत जात असताना त्यांचे पाय चिखलाने माखले होते. त्यावेळी पाय धुण्यासाठी त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे? असा प्रश्न नाना पटोलेंचे पाय धुणाऱ्या विजय गुरव याने केला आहे. "पटोले हे माझ्या वडिलांसमान आहेत. ते माझे दैवत आहेत. मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेन." असे म्हणत त्यांनी विरोधकांचाही चांगला समाचार घेतला आहे.

पटोले यांचे पाय धुणारा कार्यकर्ता हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कालखेड गावाचा आहे. विजय गुरव असे त्याचे नाव असून तो काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. अकोला, वाशिम, बुलढाणा या भागात पटोले आले की हा कार्यकर्ता आवर्जून त्यांच्या सेवेत असतो.

पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव
पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव

विरोधकांचा आरोप काय?

नाना पटोले यांचे पाय धुण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर नाना यांच्यावर जोरदार  टिका करण्यात येत आहे. नाना तुम्ही संत झालात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. लोकसभेत जास्त जागा काय जिंकल्या नाना हवेतून खाली यायला तयार नाही अशीही टिका झाली. शिवाय नेता हा कार्यकर्त्यांमुळे असतो. अशा वेळी कार्यकर्त्याला पाय धुवायला सांगणे या गोष्टीचा धिक्कार करतो. अशा शब्दात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पटोले यांच्यावर टिका केली होती.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news