जळगाव : गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे जप्त, दोन आरोपींना अटक

file photo
file photo
Published on
Updated on

जळगाव – पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील भुसावळ शहरात रेल्वे यार्डमध्ये एका चार चाकी वाहनातून गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मॅगझीनसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. ९ रोजी रेल्वे यार्ड या भागात झायलो एम एच १९ बी जे ८१९९ या गाडीत हत्यार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक गजानन पडघम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर गाडीचा शोध घेऊन गाडीची तपासणी केली असता यामध्ये आरोपी योगेश महेश वंजारे राहणार खडका विशाल भीमराव साळुंखे (रा. धुळे हल्ली मुक्काम खडका) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून एक गावठी कट्टा पाच जिवंत काडतूस मॅगझीनसह पोलिसांनी जप्त केले.

याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील गाडीची माहिती काढली असता ही गाडी विलास सपकाळे यांच्या मालकीची आहे. या तिन्ही आरोपींना विरोधात भुसावळ शहर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सय्यद हे करीत आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news