Gulabrao Devkar | माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची साडेचार कोटींची फसवणूक; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या शैक्षणिक संस्थामध्ये अपहार
Gulabrao Devkar | माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची साडेचार कोटींची फसवणूक; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
Published on
Updated on

जळगाव : माजी राज्यमंत्री तथा श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी गुलाबराव बाबुराव देवकर यांच्या फिर्यादीवरून एका व्यक्तीविरुद्ध तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांच्या अपहार व फसवणुकीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाबराव देवकर (वय ७०, रा. वास्तुनगर, सावखेडा शिवार, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याने दि. १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत विश्वास संपादन करून श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केला.

आरोपीने संस्थेच्या निधीचा अपहार करून एकूण ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे या संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने एमआयडीसी पोलीस करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news