Jalgaon News | कमी-जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

संग्रहित
संग्रहित
Published on
Updated on

जळगांव पुढारी वृत्तसेवा – किडीधारक शेतकऱ्यांनी पिक विमा योजना 2023 -24 अंतर्गत पिक विमा घेतलेला असेल व कमी तापमानात नुकसानीमुळे त्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २६,५०० रुपये तर जास्त तापमानातील नुकसानमुळे 36 हजार प्रति हेक्टर लाभ मिळणार आहे.

पुनर्रचित हवामानावर आधारित "फळ पिक विमा योजना आंबिया बहार" सन २०२३-२४ मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की दि. १ ते ३० एप्रिल या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळात सलग ५ दिवस तापमान ४२ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने; केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसून, बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असुन या शेतकऱ्यांना 36 हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे. तसेच या पूर्वी १ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील ३६ महसूल मंडळात सलग ३ दिवस ८ डिग्री व त्यापेक्षा कमी तापमानामुळे प्रति हेक्टर रक्कम २६,५०० रुपये अशी नुकसान भरपाई आधीच मंजूर झाली आहे.

जास्त तापमान मुळे नुकसान भरपाईस पात्र जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

1. अमळनेर : अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे.
2. भडगाव : भडगाव, कजगाव, कोळगाव.
3. चाळीसगाव : बहाळ, चाळीसगाव, हातले खडकी बू., मेहुनबारे, शिरसगाव, तळेगाव.
4. धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
5. एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह.
6. जळगाव : असोदा, नशिराबाद, जळगाव शहर,भोकर, म्हसावद, पिंप्राळा.
7. पाचोरा : गाळण बु., कु-हाड बु., नगरदेवळा, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव बु., वरखेडी बु.
8. पारोळा : बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळावे,तामसवाडी.
9. भुसावळ : भुसावळ, कु-हे, वरणगाव, पिंपळगाव खु.
10. बोदवड : बोदवड, नाडगाव.
11. चोपडा : चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर.
12. जामनेर : जामनेर, पहूर, नेरी बु., शेंदुर्णी, वाकडी.
13. मुक्ताईनगर : अंतुर्ली, घोडसगाव, कु-हे, मुक्ताईनगर.
14. रावेर : ऐनपुर, खानापूर,खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., सावदा.
15. यावल : बामनोद, किनगाव बु.

कमी तापमान मुळे नुकसान भरपाईस पात्र जिह्यातील तालुका व महसूल मंडळे खालील प्रमाणे.

1. अमळनेर : अमळनेर, अमळगाव, मारवड, नगाव, पातोंडा.
2. भडगाव : कजगाव, कोळगाव
3. चाळीसगाव : बहाळ, शिरसगाव
4. धरणगाव : चांदसर, साळवा, सोनवद
5. एरंडोल : उत्राण
6. जळगाव : भोकर, म्हसावद
7. पारोळा : बहादरपूर, शेळावे
8. बोदवड : बोदवड, करंजी
9. चोपडा : चोपडा, धानोरा प्र., गोरगावले, हातेड बु.
10. जामनेर : फत्तेपूर, जामनेर, नेरी बू.
11. मुक्ताईनगर : अंतूर्ली घोडसगाव, मुक्ताईनगर
12. रावेर : खानापूर, खिर्डी बु., निभोरा बु., रावेर, सावदा
13. यावल : बामनोद, फैजपूर

पिक विमा योजना २०२३-२४ अंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना कमी व अधिक तापमान  झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे, दुहेरी लाभ शेतकऱ्यांना मिळेल. – खासदार रक्षा खडसे

…………………………………………….

शेतकऱ्यांना पीक विमा योजना अंतर्गत पिक योजनेचा लाभ घेतला आहे किंवा पॉलिसी घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना कमी अधिक तापमानामुळे नुकसान झाल्याचे नुकसान भरपाई मिळणार आहे.- आमदार चंद्रकांत पाटील

हेही वाचा-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news