

जळगाव : पुढारी ऑनलाइन डेस्क | जळगावात महापालिकेने कोर्ट ते महर्षी दधिची चौकापर्यंत रस्त्यावरचे 30 अतिक्रमणे हटवली आहे. मनपाच्या पथकाने या अतिक्रमणावर हातोडा चालवत कारवाई केली. यावेळी फुले मार्केटसमोर अतिक्रमण हटवत असताना विक्रेत्यांनी पथकांशी वाद घातला होता.
जळगावात महापालिकेने कोर्ट ते महर्षी दधिची चौकापर्यंत रस्त्यावरचे 30 अतिक्रमण हटवले. 30 कच्च्या अतिक्रमणांवर मनपाच्या पथकाने हातोडा चालवला तर 10 भाजीला विक्रेत्यांकडून प्रत्येकी 500 रूपयांचा दंड वसूल केला. जळगाव शहरातील रस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आहे. फुले मार्केटसमोर अतिक्रमण हटवत असताना विक्रेत्यांनी पथकांशी वाद घातला