Jalgaon News : अमळनेर नगरपालिकेतून निवडणुकीचा श्रीगणेशा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अर्ज दाखल करण्यास सुरुवात
जळगाव जिल्हा / Jalgaon District
जळगाव जिल्हाpudhari file photo
Published on
Updated on

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया (दि.10) पासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील १८ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी ही निवडणूक होत असून, अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर अशी ठेवण्यात आली आहे.

पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अमळनेर नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. याच अर्जासह जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित १७ नगरपालिका जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल आदी येथे पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने पहिला दिवस निरंक गेला. त्यामुळे सुरुवातीला उमेदवारांमध्ये विशेष हालचाल दिसून आली नाही, असे प्रशासकीय सूत्रांकडून कळविण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा / Jalgaon District
Local body election: वेगवेगळ्या इपिक क्रमांकावर एकाच व्यक्तीची नोंद; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आव्हान
  • एकूण संस्था: १८ (नगरपालिका व नगरपंचायती)

  • अर्ज दाखल करण्याची मुदत: १० ते १७ नोव्हेंबर

  • पहिल्या दिवशी दाखल अर्ज: १ (अमळनेर नगरसेवक पदासाठी)

  • अर्ज नसलेल्या नगरपालिका: १७

  • दरम्यान, पुढील काही दिवसांत उमेदवारांची अर्ज भरण्यास हालचाल वाढणार असून अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news