जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले होते चार जून रोजी मंगळवारी रात्री घरी बोलल्यानंतर बोलत असताना वोल्खोव्हा नदीच्या किनाऱ्यावर फिरत होते त्याचा बुडून मृत्यू झाला होता. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने असून त्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे मुंबईला दाखल झाल्यानंतर मुलांचे शव त्यांच्या परिवाराच्या ताब्यात गुरुवार (दि.13) रात्री अकरा वाजता देण्यात आले आहेत.
रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलेले होते. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय कडून देण्यात आली आहे आलेले असून भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील संपर्क साधला होता. अशी माहिती जिल्हाधिकारी यांना दुतावासाकडून मिळाली होती. त्यानुसार परिवाराकडे पार्थिव सुपूर्त करताच परिवार सुन्न झाले असून नि:शब्दता पसरली.
काय घडलं होत?
जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी मुंबईतील एका विद्यार्थ्यासह रशियातील (Russia) वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी फेरफटका मारत मारायला गेले असता लाट आल्याने त्यांचा बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचा सहकारी विद्यार्थी अभ्यासाच्या फावल्या वेळेत वोल्खोव्ह नदी किनारी समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. यावेळी एक मोठी लाट आली आणि या पाण्याच्या लाटेने तिघांचा जीव घेतला.
जिशानचे आईसोबत शेवटचे संभाषण..
ही दुर्घटना घडण्याच्या पूर्वी जिशान पिंजारी या विद्यार्थ्याने त्याच्या आईशी संपर्क साधला होता. यावेळी त्याची आतेबहीण जिया पिंजारी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे. हे क्षण जिशान आपल्या आईला दाखवत होता. त्यावेळी जिशानच्या आईने त्यांना लवकर पाण्याबाहेर निघण्यास सांगितले होते. यावर जिशानने आम्ही लगेचच घरी निघतो, असे म्हटले. मात्र आईने आणि मुलाचे संभाषण संपताच अवघ्या काही मिनिटात जिया, जिशान, हर्षल देसले नदीच्या पाण्यात वाहून गेले होते.