Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपूल रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

Jalgaon News : राष्ट्रीय महामार्ग व उड्डाणपूल रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुरली, नरवेल, धामण डे, बेलखेडा, भोकरी या शिवारातून प्रस्तावित असलेला राष्ट्रीय महामार्ग व अंतुरली पूर्ण फाटा वरील उड्डाणपूल रद्द करणे बाबत मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील संघर्ष समितीच्या वतीने मुक्ताईनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अंकलेश्वर ते बऱ्हाणपूर महामार्ग हा रावेर तालुक्यातून वाघोदे गावापासून रावेर शहराजवळ नियोजित होता परंतु या मार्गात बदल करून वाघोदे गावापासून विवरा ,निंबोला, विटवां, थेरोळा, भोकरी, बेलखेडा, धामणदे- नरवेल- अंतुली यामार्गे राष्ट्रीय क्रमांक 753 ला जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या रस्त्याचा मार्ग बदलल्यामुळे रावेर तालुक्यावर विपरीत परिणाम होणार असल्याने त्याला विरोध होत आहे. अंतुरली परिसरातून हा मार्ग प्रस्थावित केल्याने शेतकरी वर्ग याला विरोध करीत आहे. मुक्ताईनगर भागातून याला नेणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या महामार्गाच्या नियोजनामुळे जमिनीचे दोन तुकडे होतील व ते नियमित आकाराचे व अनियमित आकाराच्या होतात हे शिल्लक क्षत्रिय अत्यंत कमी राहिल व उरलेल्या जमिनी कोणत्याही व्यवसायिक दृष्टीने उपयोगात येणार नाही. शेतकऱ्यांचा शासनाचा व संपूर्ण विचार करून अंतरली परिसरातील प्रस्तावित महामार्ग रद्द करून पुरवणीची ड्रायव्हर भागातूनच महामार्ग देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन प्रकल्प संचालक पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर यांना देण्यात येऊन मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील संघर्ष समितीच्या वतीने मुक्ताईनगर बऱ्हाणपूर मार्गावर  संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे विनोद तरड यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news